PM Narendra Modi esakal
उत्तर महाराष्ट्र

PM Narendra Modi Nandurbar Daura : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे उद्या वाहतूक मार्गात बदल!

Nandurbar News : वाहनधारकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे

सकाळ वृत्तसेवा

PM Narendra Modi Nandurbar Daura : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार शहर व बाहेरील राज्य महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गात एक दिवसासाठी अंशतः बदल करण्यात आला आहे. वाहनधारकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे. (Nandurbar PM Narendra Modi Daura news)

नंदुरबार लोकसभेतील भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी (ता. १०) दोंडाईचा रस्त्यावरील चौपाळे शिवारात स्वामी समर्थ केंद्र परिसरातील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानांना व्हीआयपी सुरक्षाव्यवस्था आहे, तसेच सभेसाठी मतदारसंघातील समाविष्ट विविध तालुक्यांतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

त्यासाठी नागरिक वाहनांद्वारे येतील. वाहनांची संख्या व नागरिकांची गर्दी यामुळे शहरात येणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी नंदुरबार ते दोंडाईचा या मार्गासह शहराकडे येणाऱ्या काही मार्गांवरील वाहतुकीच्या मार्गात अंशतः सभेच्या काळापर्यंत बदल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

त्याळे वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. ती अशी ः दोंडाईचाकडून येणारी लहान चारचाकी वाहने, बस वावद येथून उमर्देमार्गे नंदुरबार शहरात उड्डाणपुलाखालून येतील. दोंडाईचाकडून येणारी अवजड वाहने दोंडाईचा-सारंगखेडामार्गे शहादा-प्रकाशाकडे जातील.

नवापूर व साक्रीकडून येणारी वाहने ढेकवदमार्गे पाचोराबारी-करणखेडा, वाका चार रस्तामार्गे प्रकाशा-शहादाहून धुळ्याकडे जातील. करण चौफुलीकडून येणारी वाहने उड्डाणपुलाखालून उमर्दे-वावदमार्गे दोंडाईचा-धुळ्याकडे जातील.

शहादा-प्रकाशाकडून येणारी वाहने वाका चार रस्ता, करणखेडा-पाचोराबारी-ढेकवदमार्गे साक्री-नवापूरकडे जातील. हा बदल १० मेस सकाळी सहापासून, तर मोदी यांची सभा संपेपर्यंत लागू राहील. वाहनधारकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT