Nandurbar Police News ESAKAL
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Police News : कुडकुडणाऱ्या निराधारांना खाकीची ऊब

सकाळ वृत्तसेवा

शहादा : अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करीत असताना जिल्ह्यातील पोलिस दलाने वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून थंडीत कुडकुडत फुटपाथवर उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना मायेची ऊब देत शहादा पोलिसांनी ब्लॅंकेट व चादरवाटप केले. ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार खाकीतल्या माणुसकीने निराधारदेखील भारावून गेले.

नववर्षाच्या जल्लोषात होणाऱ्या स्वागतासाठी कुठेही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी जिल्हा पोलिस दल अलर्ट मोडवर होते. त्यासाठी जागोजागी पोलिसांनी दिवसा व रात्री नाकाबंदी, पेट्रोलिंग बंदोबस्त लावला होता. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह सर्वच पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर होते.

यादरम्यान त्यांना कडाक्याच्या थंडीत असंख्य निराधार जागोजागी रस्त्याच्या कडेला, बस स्टॅन्ड, दुकानांच्या आडोशाला कुडकुडत उघड्यावर झोपल्याचे पोलिस अधीक्षकांना दिसून आले. त्यांनी तत्काळ सर्वच सहकाऱ्यांना अशा निराधार व्यक्तींना सहकार्य करण्याचे सूचित केले.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

शहादा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनीदेखील सहकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांच्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करीत गरीब, फिरस्ते व भिक्षुक अशा असंख्य गरीब व निराधारांच्या अंगावर स्वतःच्या हातांनी ब्लॅंकेट व चादर पांघरून मायेची ऊब दिली. खाकी वर्दीच्या नववर्षाच्या या अनोख्या उपक्रमाने भारावून गेलेल्या निराधारासह नागरिकांनीही कौतुक केले आहे.

''अनेक वेळा थंडीने मृत पावणाऱ्या नागरिकांच्या मृतदेहाचे पंचनामे करताना मन दुःखी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना मायेची ऊब देऊन पुण्याचे काम करताना मनस्वी आनंद झाला व समाधान वाटले.'' -राजन मोरे, प्रभारी पोलिस निरीक्षक, शहादा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Done Maharaj Bhakankun : 'अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा ते 'भारत हिंदू राष्ट्र होणार...'; श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीत डोणे महाराजांची भाकणूक, तिसऱ्या महायुद्धाबाबतही केली भविष्यवाणी

Supreme Court : १०० टक्के इथेनॉल इंधन कुठून येणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Ratnagiri Alphonso Mango : दिवाळीत चाखायला मिळणार हापूस! रत्नागिरीतील गावखडीत ऑक्टोबरमध्येच आंब्याची पहिली पेटी तयार; 21 हजार रुपयांचा दर अपेक्षित

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

Rahul Gandhi: ‘राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या’; राहुल गांधींचे महारॅलीसाठी देशवासीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT