Although there is no heavy rain in the area, the water of Tapi river esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Rain Crisis: शहादा तालुक्यातील काही भाग अजूनही कोरडाच! खरीप धोक्यात येण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Rain Crisis : शहादा तालुक्यातील काही भाग अजूनही कोरडाच आहे. निम्मा जुलै संपला तरी अद्यापही निम्म्या तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप सुरवातीलाच धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

रोज आभाळ भरून येते; परंतु वरुणराजा बरसत नसल्याने शेतकरी आशाळभूत नजरेने आकाशाकडे पाहत आहे.

तापी नदीच्या उगमस्थान परिसरात पाऊस झाल्याने नद्या दुथडी वाहत आहेत. परंतु तापी नदीवरील उपनद्या, बंधारे, तलाव मात्र कोरडेठाक आहेत. (Nandurbar Rain Crisis Some parts of Shahada taluka still dry)

तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. मात्र जिल्ह्यातील सर्वांत मोठी नदी असलेली तापी नदी दुथडी वाहत आहे. तापीचा उगम आणि जोडणी क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले.

पर्यायाने तापी पात्रात भरपूर पाणी आहे. मात्र तिच्या अनेक उपनद्या, बंधारे, तलाव अद्यापही कोरडे आहेत. हतनूरसह सारंगखेडा प्रकल्पाचे पाणी सोडल्याने तापी दुथडी वाहत आहे.

सारंगखेडा ते प्रकाशादरम्यान तापी काठावरील अनेक गावांमध्ये पाऊसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाची एकूणच स्थिती पाहता दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करताना आपले दुःख कसे व्यक्त करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पावसासाठी जोगवा

तालुक्यात यंदा पाऊस लपंडावचा खेळ खेळत आहे. पाऊस कोठे बरसत आहे, तर कोठे नुसतेच ढग दाटून येत आहेत. अद्यापही अनेक गाव शिवारात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गावागावांत वरुणराजा बरसावा म्हणून जागरणासह जोगवा मागितला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तापीच्या उगमस्थानी पाऊस झाल्याने हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीला पूर आला आहे. सारंगखेडा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडल्याने तापी दुथडी वाहत आहे.

मात्र परिसरात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. एकीकडे पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट, तर दुसरीकडे जीवदान मिळालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे.

१८ जुलैपर्यंत अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्यात १३ ते १८ जुलैदरम्यान सहा दिवस पावसासाठी अलर्ट केले आहे. मात्र १६ जुलैपर्यंत पाऊस झालेला नाही.

या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बळीराजाच्या सर्व आशा जुलैच्या पावसावर असतात. या महिन्यात समाधानकारक पाऊस पडला तरच चांगले पीक होणार आहे. पेरण्या झालेल्या ठिकाणी पावसाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT