Water Supply  esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Exclusive : जिल्ह्यातील 195 गावांसाठी 216 लाखांचा आराखडा; 3 टप्प्यात नियोजन

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २१६ लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.

धनराज माळी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २१६ लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार तीन टप्प्यांत तालुकानिहाय उपाययोजना करण्यात येऊन पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आराखड्यात विहीर खोलीकरण, पाणीपुरवठा योजना, सिंचन विहिरी दुरुस्ती, अधिग्रहणाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन ही योजना संजीवनी ठरणार आहे. (Nandurbar rural water supply department of Zilla Parishad has prepared scarcity action plan of 216 lakhs to alleviate water shortage)

या योजनेची कामे सुरू आहेत. त्यातून जिल्ह्यात ‘हर घर नल, हर घर जल’ मिळणार आहे. जलजीवन योजनेची कामे प्रगतिपथावर असली तरी सध्या अनेक गावांना पाणीटंचाई भासते. त्यावर उपाययोजन म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार करून त्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केले आहे.

त्यासाठी तीन टप्पे ठरविले आहेत. संबंधित गावांतील लोकसंख्या व तेथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आहेत त्याच स्रोतांच्या माध्यमातून अथवा विहीर अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहीर खोदणे आदी कामे प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार नियोजन केले जात आहे. ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ असा टंचाई कालावधी गृहीत धरण्यात आला आहे.

त्यात तीन महिन्यांप्रमाणे तीन टप्पे करण्यात आले आहेत. मागील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून त्यावर आवश्‍यक उपाययोजनांसाठी २१६.१५ लाख रुपये खर्चाचा हा कृती आराखडा आहे. या निधीतून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ व जानेवारी ते मार्च २०२४ असे दोन टप्पे निघून गेले आहेत. आता एप्रिल ते जून २०२४ या शेवटच्या टप्प्याची कामे सुरू आहेत. (latest marathi news)

या तिन्ही टप्प्यात एकूण १९५ गावांचा टंचाईमध्ये समावेश आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात ९५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यांपैकी ९३ गावांसाठी पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर आहे. नवापूर तालुक्यातील दोन गावांमध्ये विहीर खोलीकरण, ४२ गावामंध्ये विंधन विहिरी करण्यात येणार आहेत.

शहादा तालुक्यातील ४९ गावांमध्ये विंधन विहिरींचे काम करणार आहेत. तळोदा तालुक्यातील २३ व अक्कलकुवा तालुक्यात सात गावांमध्ये विंधन विहिरी करण्यात येत आहेत. असे एकूण विहिरी खोलीकरण तीन, विहीर अधिग्रहण ९५, टँकरने पाणीपुरवठा एक, पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावरील कामे ९३ आणि विंधन विहिरींच्या १२१ टंचाईच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी २१६.१५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गौऱ्याचा पाडात टँकर

नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भागातील गौऱ्याचा पाडा (ता. धडगाव) येथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. इतर गावांमध्ये सध्या तरी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासारखी परिस्थिती नाही. योग्य उपाययोजना प्रशासन करीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

तालुकानिहाय टंचाईची गावे

तालुका गावे पाडे

नंदुरबार - ९५-९५

नवापूर - ४०-४४

शहादा - २६-४९

तळोदा -२४-२४

अक्कलकुवा - ७-००

धडगाव -३-४

------------------

एकूण ः १९२-१९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

Sanjay Shirsat: 33 देशांमध्ये गद्दारांची ओळख... बनियन अन् चड्डी... संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची खोचक टिका

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Satara Crime: 'विनयभंगप्रकरणी युवकास अटक'; युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास

SCROLL FOR NEXT