Farmer Mahendra Shantaram Borse tokens maize through a token machine in his field. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : खरीप हंगामात पेरणीसाठी टोकन यंत्राची साथ; मजूर टंचाईवर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून यंत्राचा अवलंब

Nandurbar : सध्या खरीप हंगामातील कापूस, मका लागवड व इतर कडधान्य पेरणीला सुरवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : सध्या खरीप हंगामातील कापूस, मका लागवड व इतर कडधान्य पेरणीला सुरवात झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्वत्र मजुरांची चणचण भासते, याचा विचार अंमलात आणून टोकन यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांची पेरणी, लागवडीची कामे वेळ, खर्च व अल्प मेहनतीने होत असल्याने सध्या या यंत्राचा वापर शेतकऱ्यांकडून केला जात आहे. खरीप हंगाम आला म्हणजे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग असते. ()

या काळात प्रत्येक शेतकऱ्यांची शेती कामे आटोपण्याची लगबग असते मात्र, नेमके याच काळात मजुरांची टंचाई निर्माण होते. यामुळे मजुरांना जादा पैसे देऊन योग्य काळात लागवडीची कामे उरकून घ्यावी लागतात. यावर, पर्यायी उपाय म्हणून शेतकरी मका टोकन यंत्राचा अवलंब करू लागले आहेत. कळंबूसह परिसरात आठ दिवसांपूर्वी कापूस, मका लागवडी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस, मका लागवडीला प्राधान्य दिले आहे.

एकाच वेळी लागवडीची धांदल उडत असल्याने काही शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करून लागवडीस प्राधान्य दिले आहे. कापूस वा मकाच्या एका पिशवीसाठी मजुरांना ६०० ते ७०० रुपये मजुरी द्यावी लागते, अधिक पैसे मोजूनही काही वेळा मजूर मिळत नसल्याने बाहेरगावाहून मजूर आयात करावे लागतात. याला पर्याय म्हणून काही निवडक शेतकऱ्यांनी वाजवी किमतीत उपलब्ध असलेले मका पेरणीचे टोकन यंत्र विकत घेऊन त्याच्या सहाय्याने पेरणी करून घेत आहेत. (latest marathi news)

यंत्र वापरायला अगदी सोपे आहे. वजनाने हलके असून शेतकऱ्यांना परवडेल असे आहे. या बियाणे टोकन यंत्राच्या साह्याने शेतकरी बांधव कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, चवळी, हरभरा, वाटणा, भुईमूग अशा विविध प्रकारच्या बियाण्यांची लागवड करू शकतात. हे यंत्र अत्यंत हलके असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजतेने नेता येते. त्यामुळे या बियाणे टोकन यंत्राची उपयोगिता खूपच वाढली आहे. झटपट पेरणी व मजुरी वाचत असल्याने टोकन यंत्र शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे‌.

एका दिवसात चार एकर

या यंत्रांच्या सहाय्याने बियाणे टोकन करू शकतो, यामध्ये वेगवेगळे बियाणे रोलर असल्यामुळे सर्व प्रकारचे बियाणे टोकन करता येते. बियाण्याची खोली व एक व दोन बियाणे एकदाच टोकन करता येतात. या यंत्रात एकावेळी सर्वसाधारण दोन किलो बियाणे बसते. एक व्यक्ती अंदाजे एका दिवशी चार एकर बियाणे टोकन करू शकतो.

''सर्वत्र खरिपाची कामे सुरू असल्याने मजूर मिळणे कठीण त्यात अधिक पैसे मोजूनही समाधानकारक काम होईल असे नाही. या यंत्राद्वारे टोकन केल्यास पिकाची उगवण क्षमता व अंतर समान येत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे पहिल्यांदा या यंत्राचा वापर करून मका लागवड केला.''- महेंद्र बोरसे, शेतकरी कळंबू (ता.शहादा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT