Eknath Khadse esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : खडसे भाजपमध्ये गेले तरी मी पवारांसोबतच राहणार : उदेसिंग पाडवी

Nandurbar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नंदुरबार जिल्हास्तरीय आढावा बैठक आदिवासी सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन पाडवी बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जरी गेले तरी मी शरदचंद्र पवार यांच्यासोबतच काम करणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केले. त्यामुळे खडसे भाजपमध्ये गेल्यावर पाडवीदेखील भाजपमध्ये जातील या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. (Nandurbar News)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नंदुरबार जिल्हास्तरीय आढावा बैठक आदिवासी सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन पाडवी बोलत होते. यावेळी कुलदेवी याहा मोगी माता, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस युवक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस ॲड. दानिश शेख व युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचा अहवाल तपासून संघटन मजबुतीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीत जिल्ह्यातील नंदुरबार ,तळोदा ,शहादा, नवापूर ,धडगाव, अक्कलकुवातील पदाधिकारी व आमंत्रित सदस्य उपस्थित होते. आढावा बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस हितेंद्र क्षत्रिय यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT