Dam (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Water Scarcity : नंदुरबारवाशियांनो, पाणी जरा जपून वापरा! शहाराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अत्यल्प साठा

Nandurbar News : नंदुरबार शहराला आजमितीस पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. याही परिस्थितीत नंदुरबारवाशियांना समाधानकारक पाणी मिळत असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : नंदुरबार शहराला आजमितीस पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. याही परिस्थितीत नंदुरबारवाशियांना समाधानकारक पाणी मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र, सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणातील साठा केवळ २९ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र, तरीही शहरवाशियांना जूनपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन पालिका प्रशासन करीत आहे. (Nandurbar Water Scarcity Insufficient storage in dam that supplies water to city)

त्यासाठी आंबेबारा धरणातून पाणी आणून नंदुरबारवाशियांची तहान भागविली जात आहे. पाणी समस्या निर्माण होऊ नये, म्हणून नागरीकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठा कमी झाला होता. त्यामुळे शेतीसाठी वापरण्यात येणारे पाणीही सिंचन प्रकल्पांतून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पुरेशे पोहोचले नाही.

अनेक गावांमध्ये पिण्याचा पाण्याची समस्या उद्भवली आहे. त्यात नंदुरबार शहरही अपवाद नाही. शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरण पावसाळ्यात जेमतेम ५५ टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच शहरवाशियांना पाणीबाणीला सामोरे जावे लागणार होते. मात्र, शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने शहराला पाणीपुरवठा करण्याच्या पद्धतीत बदल केला.

शहरवाशियांना आवाहन केल्यानुसार सुरूवातीस तीन दिवसांआड तर आता पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. श्री. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी योग्य नियोजन केले आहे. म्हणून तीव्र उन्हाळ्यातही नंदुरबारकरांना पाच दिवसांआड का होईना मुबलक पाणी मिळत आहे. (latest marathi news)

परंतु, सद्यस्थितीत वीरचक धरणातील जलसाठा २९ टक्क्यांवर आला असून, हा साठा शहरवाशियांना पुरेसा नाही. त्यामुळे पालिकेने जवळच असलेला अंबेबारा धरणातून ४० टक्के पाणी उचलण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी स्वतंत्र पाटचारी तयार करून तेथून पाणी वीरचक धरणापर्यंत आणले जात आहे.

४० टक्क्यांमध्ये पहिल्या टप्प्यात साधारण २० टक्के पाणीसाठा उचलला आहे. त्यानंतर पुन्हा गरज भासल्यास उचलण्यात येणार आहे. त्यामुळे जलसाठा कमी असला तरी प्रशासनाकडून नंदुरबार शहरवाशियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, यासाठीचे नियोजन केले जात आहे.

पाण्याचा अपव्यय टाळावा

नंदुरबार शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांना तोट्या बसवाव्यात, मोटार लावल्यास पाणी भरणे झाल्यावर ती तत्काळ बंद करावी, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. वाहने धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा, अंगणात पाणी शिंपडून पाणी वाया घालवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT