Last year the farmers came together and plowed the Gomai river basin. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Water Scarcity : बागायतदार शहादा तालुक्यात अनेक बंधारे, जलसाठे कोरडेठाक

Nandurbar News : जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात पावसाळ्यात पाण्याचा टिपूसही न साठल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी व नागरिक चिंतातुर झाले आहेत.

कमलेश पटेल

शहादा : गेल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहादा तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक बंधारे व जलसाठे कोरडेठाक राहिले होते. जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात पावसाळ्यात पाण्याचा टिपूसही न साठल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी व नागरिक चिंतातुर झाले आहेत. (Nandurbar Water Scarcity Many dams water reservoirs dry up in Shahada taluka)

बागायतदार तालुक्यातील अनेक भागांतील बोअरवेल्स आटल्याने बागायती शेती धोक्यात आली आहे. शहादा तालुक्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तालुक्याची बागायतदार तालुका म्हणून सर्वदूर ओळख आहे. केळी, पपई, ऊस व मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पण या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते.

आजची परिस्थिती बघता पाण्याची पातळी खोलवर गेल्याने एप्रिल व मेमध्ये पिकांची स्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक बोअरवेल्स कोरडे व्हायला लागले आहेत. पावसाळ्यापूर्वी उपाययोजना आवश्यक आहेत. साधारणता चारशे फुटांपेक्षा जास्त खोलवर पाण्याची पातळी गेली आहे.

‘गंगोत्री’मुळे भूजल स्तर उंचावला

शासनाची ‘पाणी अडवा व पाणी जिरवा’ मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, पावसाळ्यापूर्वी नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुराचे पाणी अडविण्यासाठी आतापासून उपक्रम राबविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जानेवारीत विविध सेवाभावी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तसेच शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी गंगोत्री फाउंडेशनमार्फत शहादा शहराला लागून गेलेल्या गोमाई नदीपात्रात नदी नांगरटी करण्याच्या उपक्रम राबविला होता.

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन नदी नांगरटी केली होती. ज्याच्यामुळे पहिल्या पावसाचे पाणी नांगरटी केल्या गेलेल्या चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचून मोठे पूर आल्यानंतर उपयोग झाला होता. पाण्याची पातळी ४०० फुटांवरून ९० ते १२५ फुटांपर्यंत आली होती.

नदी नांगरटी करावी

गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी सरासरी पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ शकते म्हणून विविध सेवाभावी संस्था, संघटना, विविध ग्रुप, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीने गोमाई नदीपात्रात नांगरटी करावी. दोन वर्षांपूर्वी गोमाई नदीपात्रात तिखोरा, पिंगाणे, धुरखेडा, डामरखेडा, करजई या गावांमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर देऊन मोफत नांगरटी केलेली होती. याव्यतिरिक्त शहादा तालुक्यात जे मोठे नाले आहेत त्यांचे पात्र मोठे आहे. पावसाळ्यात मोठा पूर येतो. अशा नाल्यांच्या पात्रातदेखील नांगरटी करावी, अशी मागणी आहे.

"गंगोत्री फाउंडेशनमार्फत भूगर्भातील जलस्तर वाढविण्यासाठी नदी नांगरटी, लहान-मोठे धरण, तलाव, नाले यांच्यातील गाळ काढण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे जमिनीत पाण्याचा स्तर वाढण्यास मदत झाली व अनेक कूपनलिकांना पाणी येऊन शेकडो एकर शेती ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांनी बारमाही पिके घेतली. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भूजल पातळी पुन्हा खालावली आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब करून पाण्याची बचत करावी."

-अभिजित पाटील, अध्यक्ष, गंगोत्री फाउंडेशन, शहादा

"जलयुक्त शिवारअंतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात यंदा अल्प पर्जन्यमानामुळे पाण्याचा टिपूसही साठला नसल्याने कूपनलिका बंद पडल्या आहेत. बागायती शेती बोअरवेल्स आटल्याने कोरडवाहू होत आहे."-श्रीकांत पटेल, शेतकरी, बामखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT