anil gote 
उत्तर महाराष्ट्र

नव्या दमाने कामाला लागा ः अनिल गोटे 

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत "जे झालं ते गंगेला न्हाल' असे समजून पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्या दमाने कामाला लागा. असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. यावेळी व्यासपीठावरील पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून पक्षाशी प्रामाणिक राहण्याच्या निर्धार केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा शनिवारी भगवती लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी श्री. गोटे बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक नाना महाले, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव मुख्तार शेख, जितेंद्र मराठे, राजू पाटील, माधव चौधरी, दादा कापडणीस, सुरेंद्र कुवर, पुष्पा गावित, अश्विनी जोशी, जगदीश माळी आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी प्रास्तावीक केले. तसेच डॉ. मोरे, शांतीलाल साळी, उपसरपंच डी.जी मोरे, अभियंता बी.के पाडवी, राणूमल जैन आदींनी मनोगत व्यक्त केले. 

घरांवर पक्षाचे झेंडे लावा 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणुकीत पराभव झाला. पराभवाने घाबरून जाऊ नये. मी कार्यकर्त्यांच्या पराभव सहन करेन पण लज्जास्पद पराभव सहन करणार नाही. कार्यकर्त्यांनी घरावर झेंडे लावून वातावरण निर्मिती करून गाव तेथे राष्ट्रवादीचे शाखा उघडण्यात यावी अशा सूचना अनिल गोटे यांनी केल्या. 

राष्ट्रवादीमुळे जिल्ह्याचा विकास 
निरीक्षक नाना महाले म्हणाले, की जिल्ह्यातील वाड्या, पाड्यांवरील रस्ते तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात विकास राष्ट्रवादी कॉंग्रेस मुळे झाला. पक्ष कोण सोडून गेलं याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी पक्षकार्य कार्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा होऊ शकत नाहीये. गटातटाचे राजकारण न करता पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवा. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीपर्यंत पोचविण्यात येतील असे आश्वासन निरीक्षक महाले यांनी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT