dead body esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नाशिकचा तरुण धुळ्यात मृतावस्थेत

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील देवपूरमधील एका हॉटेलात नाशिक येथील तरुणाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला. अमेय नंदकिशोर वैद्य (वय ३५, रा. सिद्धी एन्क्लेव, योगेश्वर कॉलनी, हॉटेल सूर्यामागे, इंदिरानगर, सिडको, नाशिक) असे त्याचे नाव आहे.(Nashik youth dead in dhule news)

देवपूरमधील महामार्गालगत एका हॉटेलमध्ये ऑनलाइन बुकिंगद्वारे अमेय वैद्य आला होता. तो खोली क्रमांक ४०७ मध्ये मुक्कामी होता. मंगळवारी (ता. १२) सायंकाळी सातच्या सुमारास तो खाली उतरला. नंतर त्याच्या भेटीसाठी आलेल्या मित्रांसोबत तो जवळच रेस्टॉरंटमध्ये गेला.

रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने जेवणाचे बिल दिले, त्यानंतर तो खोलीत गेला. त्या वेळी त्याचा मित्र विजय मगर याचा हॉटेलवर फोन आला. त्याने अमेय फोन उचलत नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहे, त्याला उठवा, असा निरोप दिला.

हॉटेलमधील वेटर मंजित व इतरांनी आवाज देऊनही अमेय याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. दार उघडले असता अमेय हा नग्नावस्थेत मृत आढळला. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT