Venu P Nair while giving a relief check of one lakh rupees to the families of those who died in the railway accident. . esakal
नाशिक

Lasalgaon Railway Accident : लासलगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 1 लाखाची मदत

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळावर काम करताना सोमवारी पहाटेच्या सुमारास टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत ठार झालेले रेल्वे कर्मचारी संतोष भाऊराव केदारे, दिनेश सहादू दराडे, कृष्णा आत्माराम अहिरे, संतोष सुखदेव शिरसाठ यांच्या कुटुंबीयांना कर्मचारी युनियनतर्फे आज (ता.१४) प्रत्येकी एक लाखांच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. (1 lakh assistance to families of victims of Lasalgaon Railway Accident case nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

नॅशनल रेल्वे मजदूर, युनियन मध्य रेल्वे तथा कोकण रेल्वेचे महामंत्री आणि एआयआरएफचे सहायक महामंत्री वेणू पी. नायर यांनी चारही कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन करत प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश दिले. मृतांच्या परिवाराला सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही मदत करण्यात आली आहे.

भुसावळ मंडळ सहायक सचिव इस्रार खान, मनमाड शाखा सचिव अंबादास निकम, मनमाड शाखाध्यक्ष शबरीश नायर, अशोक खंबायत, रमेश केदारे, उत्तम गांगुर्डे, दीपक पगारे, सनी पाठक, सुरेश पगारे, भाऊराज आंधळे, संदीप सोनवणे, किरण शिंदे, विशाल उगले, राहुल झाल्टे, दीपक झाल्टे, सागर खंडांगले, नीलेश सोनवणे, भूषण लहरे आदी कामगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

IPL 2026 Qualifier 1 : गुजरात टायटन्सची पराभवामुळ डोकेदुखी वाढली! शुभमन गिल अन् संघाची झोप उडवणारी बातमी...

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तामिळनाडू सरकारने जाहीर केली पीक कर्जमाफी; 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा, 'थलपती'नं दिलेलं आश्वासन पाळलं

Bike Mileage Increasing Tips : टू व्हीलर गाडीचं मायलेज कमी आहे? मग आजच करा 'हे' 5 बदल, मायलेज होईल डबल

Latest Marathi News Live Update : ईदनिमित्त बळी देण्याची परवानगी रद्द, वरिष्ठ पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT