trimbakeshwar latest marathi news esakal
नाशिक

हर हर भोलेचा गजर करीत 1 लाख भाविकांनी घेतले त्रंबकेश्वराचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्रातील भाविकांचा पहिला श्रावण (Shravan) सोमवार व उत्तर भारतीयांचा तिसरा श्रावण सोमवार निमित्ताने ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासुनच गर्दी होती.

पहाटे चार वाजताच भाविक रांगा लावून मंदिराचे प्रवेश द्वार उघडण्याची वाट पहात होते. पाच वाजता मंदिर उघडताच सर्वत्र भोलेहर व बमबम भोलेचा गजर सुरु होता. काल सारख्याच भाविकांच्या रांगा पुर्व दरवाजा व देणगी दर्शन उत्तर दरवाजात रांगा लागल्या त्या काल पेक्षा जास्त लांबीच्या होत्या. (1 lakh devotees took darshan of Trimbakeshwar nashik Latest Marathi News)

आज देखील प्रती माणूस दोनशे रुपयांची रांग मोठी होती. सकाळी कडक उन तर दुपारी श्रावण सरी पडल्याने भाविकांच्या उत्साहात भर पडली होती. उपवासाचा दिवस असल्याने फळे व उपवासाच्या पदार्थांना चांगली मागणी होती.

दुपारी तीन वाजेला त्रंबकेश्वराच्या पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवून पालखी काढण्यात आली. पालखी समवेत विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, तृप्ती धारणे, पंकज भुतडा, भुषण अडसरे उपस्थित होते.

पालखी मेन रोड मार्गे कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. तेथे अभिषेक पुजा करुन पुन्हा त्रंबकेश्वर मंदिरात व कोठी हाॅलमध्ये नेण्यात आली.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी काही भाविक पहाटेच जात होते. दोन वर्षे मंदिरे बंद असल्याने ह्या वर्षी भाविकांचा ओघ वाढला आहे. त्याच प्रमाणात गैरसोयी वाढल्याचे दिसुन येत आहे. भाविकांना सुलभ दर्शन व शांततेत अभिषेक पुजा व तत्सम ध्यानधारणा करण्यासाठी व्यवस्था असावी अशी माफक अपेक्षा असली तरी ती करण्यासाठी त्याच पध्दतीने कार्यप्रणाली व्हावी अशी भक्त भावना व्यक्त करीत आहेत. आज वाहनतळ शहराच्या बाहेर दुरवर नेल्याने वृध्द व आजारी यांचे हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT