accident esakal
नाशिक

Nashik Accident News : ओझरला कारची रिक्षाला धडक; अपघातात 1 जण ठार 2 जण गंभीर जखमी

भरधाव वेगात असलेल्या वॅगनर कारने समोर जाणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.

उत्तम गोसावी

ओझर : येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दहावा मैल येथे भरधाव वेगात असलेल्या वॅगनर कारने समोर जाणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. (1 person killed 2 seriously injured in car rickshaw accident at Ozar nashik news)

काल शुक्रवार, ता. २६ रोजी रात्री बारा ते सव्वा वाजेच्या सुमारास विजय कुमार सुरेश बोरसे राहाणार भुसावळ हे पत्नी व आई समवेत रिक्षाने (एम एच 15 झेड 9749 ) ओझरकडून नाशिककडे जात असताना.

त्याच सुमारास ओझर बाजूकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगनर कारने (एम एच 15 एच वाय 1154 ) महामार्गावरील दहावा मैल येथील भाऊ हाँटेल समोर जबरदस्त धडक दिल्यामुळे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षामधील विजय बोरसे यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले.

तर चंद्रकला सुरेश बोरसे व रिक्षाचालक रामराव चौधरी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात अश्विनी विजयकुमार बोरसे राहाणार भुसावळ यांनी तक्रार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी कारचालक अमोल विजय जाधव रा. वडाळीभोई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पी डी जाधव हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT