American alumni Dr. popat bedse Former member of Zilla Parishad Prof. Gulabrao Kapadnis, Deepak Sawant, Praveen Sawant etc esakal
नाशिक

Nashik News : माजी विद्यार्थ्याकडून नामपूरच्या विद्यालयाला 1 हजार डॉलर्स!

सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : येथील मविप्रच्या माध्यमिक विद्यालयास अमेरिकेतील रहिवासी असलेले शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. पोपट बेडसे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तब्बल एक हजार डॉलर्सची देणगी दिली आहे.

त्यांच्या दातृत्वाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे, बागलाणचे संचालक डॉ. प्रसाद सोनवणे यांनी बेडसे परिवाराचे आभार मानले आहेत. (1 thousand dollars to school of Nampur from former american alumni student Nashik News )

मूळचे चिंचखेडे (ता. साक्री) येथील रहिवासी असलेले डॉ. पोपट बेडसे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नामपूर येथील मविप्रच्या संस्थेत झाले आहे. शालेय जीवनापासून ते अभ्यासात अतिशय हुशार होते.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. अमेरिकेत अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर ते नुकतेच निवृत्त झाल्याने अमेरिकेतच स्थायिक झाले आहेत.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

आपल्या शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्या आत्या कै. मंडोदरीबाई, कै. उखाजी सावंत यांच्या स्मरणार्थ शाळेला ८२ हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली आहे.

डॉ बेडसे यांचे चिरंजीव विकास, मुलगी अनिता, बंधू डॉ. शिवाजीराव बेडसे यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, दीपक सावंत, प्रवीण सावंत यांच्याकडे रक्कम सुपूर्द केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT