child death esakal
नाशिक

Nashik Crime News : 1 वर्षीय बालिकेचा बेवारस मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नानावली परिसर द्वारकापुरम सोसायटी संरक्षण भिंतीस लागून जागेवर शीर, दोन्ही हात आणि एक पाय नसलेले सुमारे एक वर्षीय बालिकेचा बेवारस अवस्थेत मृतदेह आढळून आला. (Nashik News)

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. मृतदेहाची अवस्था बघता नरबळी असल्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. (1 year old girl dead body was found nashik crime news)

द्वारकापुरम सोसायटी समोरील नानावली रस्त्याच्या कडेला शीर, दोन्ही हात आणि एक पाय नसलेले सुमारे एक वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवार (ता.१०) दुपारी सुमारे एक ते दीड वाजेच्या सुमारास घटना उघडकीस आली. द्वारकापुरम सोसायटीतील रहिवासी शहजाद शेख तरुण नानावली रस्त्याने दूध बाजारात जात असताना त्यास मृतदेह आढळून आला.

भद्रकाली पोलिसांना त्यांने माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी, श्री. बिडकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. वरिष्ठांना माहिती देण्यात आली. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी भेट दिली.

मृतदेह कुजलेल्या आणि दोन हात, एक पाय आणि शीर नसलेल्या अवस्थेत होता. रस्त्याला लागूनच स्मशानभूमी आहे. त्याठिकाणी लहान मुलांचे मृतदेह पुरले जाते. कुत्रा किंवा अन्य जनावरांनी तेथून मृतदेह आणला असावा. प्रथम दर्शनी घातपाताचा प्रकार नसून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त श्री. चव्हाण यांनी सांगितले. मृतदेहाची अवस्था बघता नरबळीचा प्रकार असल्याचे परिसरातील नागरिकांनी शक्यता व्यक्त केली. शिवाय रविवार (ता.९) रात्रीतून हा मुतदेह येथे टाकण्यात आला असावा. अशीही शक्यता वर्तवण्यात आली. पोलीस मात्र सर्व बाबींची शक्यता तपासून पाहत आहे. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

स्त्री जातीचे मृतदेहाचे गूढ

शीर आणि हातपाय नसलेला बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळखळून उडाली. विशेष म्हणजे अवयव नसलेले आणि स्त्री जातीच्या बालकाचे मृतदेह असल्याने पोलीस आणि नागरिकांकडून अनेक तर्कवितर्क करण्यात आले. अनेकांना मुलगी नकोशी असते. तसेच नरबळी यासह अन्य विविध प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहे. लवकरच घटनेची उकळ होणार असल्याचेही शक्यता वर्तवण्यात आली.

सीसीटीव्ही तपासणी

कन्नमवार पूल ते नानावलीपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या प्रत्येक ठिकाण आणि द्वारकापुरम सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.

"स्त्री जातीच्या बालिकेचा मृतदेह असून त्यास शीर, दोन हात आणि पाय नाहीत. प्राथमिक दर्शनी घातपात नसल्याचे आढळून येत असले तरी शवविच्छेदन अहवालानंतर सर्व बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. मृतदेह अवस्था पाहता सर्व बाबीची तपासणी केली जात आहे.' -किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त

"सकाळपासून दुर्गंधी येत होती. प्रत्यक्षात बाजारात जात असताना रस्त्याच्या कडेला अवयव नसलेला मृतदेह आढळून आला. भद्रकाली पोलिसांना माहिती दिली." -शहजाद शेख प्रत्यक्षदर्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

Gulshan Kumar यांच्या हत्येचं रहस्य २८ वर्षांनंतर उघड, मृत्यूच्या दीड वर्षाआधीच रचला होता कट, तपास अधिकाऱ्यांनी सांगितली आतली गोष्ट

SCROLL FOR NEXT