money esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील 100 कलावंतांचे मानधन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील विविध श्रेणीतील शंभर साहित्यिक, कलावंतांना मानधन मंजूर झाले आहे. गत महिन्यात गठित निवड समितीची नुकतीच पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला. (100 artistes of the district have been approved for money Nashik News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

गतवर्षी झालेल्या प्रक्रियेतून निवडल्या गेलेल्या या कलावंतांना येत्या जुलैपासून त्रैमासिक मानधन खात्यावर जमा होणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राबविण्यात येते.

समितीचे अध्यक्ष श्रावण अहीरे, नाशिकमधील कला क्षेत्राशी निगडित मान्यवर, तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही निवड केली होती. मानधनासाठी यंदा चारशे कलावंतांनी अर्ज दाखल केले होते.

हे मानधन त्यांना हयातभर मिळणार असून, त्यांच्यानंतर पत्नीलाही ते मिळत राहील. योजनेचे प्रस्ताव गटविकास अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मागविण्यात येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT