Grant Received
Grant Received esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यात 103 पशुपालकांना 27 लाखांचे अनुदान प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यासह जिल्ह्यात थैमान घातलेल्या लम्पी स्कीन आजाराने जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ११५ जनावरांचे बळी घेतले आहेत. यापैकी १०३ पशुपालकांना २६ लाख ७९ हजार रुपयांची मदत मिळाली असून, उर्वरित प्रस्ताव प्रक्रियेत असल्याने प्रतीक्षेत आहेत.

नाशिक जिल्ह्यात हा आजार नियंत्रित राहिला होता. मात्र, नंतरच्या टप्प्यात शेजारील जिल्ह्यांमधून झालेल्या जनावरांच्या वाहतुकीद्वारे या आजाराने जिल्ह्यात प्रवेश केला होता.

यानंतर पशूंचे मृत्यू होण्यास सुरुवात झाल्याने लसीकरणावर भर दिल्याने मृत्युदरावर बऱ्यापैकी नियंत्रण आणले आहे. आत्तापर्यंत ११५ लम्पीबाधित जनावरांचे मृत्यू झाले आहेत. (103 Cattle Rearers in District 27 lakhs grant received 115 lumpy infected animals have died Nashik News)

जिल्हयात एकूण १३ बाधित तालुक्यांमधील ११५ गावांमध्ये जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला होता. एकूण १ हजार ९०७ पशूंना या आजाराची लागण झाली. सद्य:स्थितीत २८८ रुग्ण या आजाराने बाधित आहेत. यातील २१ पशूंची स्थिती गंभीर, ६३ मध्यम तर २०४ पशू सौम्य आहेत.

या आजाराच्या उपचारांसाठी उभारण्यात आलेल्या ईपी सेंटरमधील पशूसंख्या ४ लाख ४२ हजार ४४१ इतकी आहे. तर या केंद्रात आत्तापर्यंत ४ लाख ३७ हजार २७५ पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ४ लाख ५७ हजार ६८५ इतक्या पशूंचे लसीकरण झाले आहे. खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ५३ हजार ४२९ पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

- प्राप्त लसमात्रा : ९ लाख ६ हजार ५५०

- शिल्लक लसमात्रा : ११ हजार ५९०

- एकूण झालेले लसीकरण : ८ लाख ९४ हजार ९६०

- एकूण मृत जनावरे : ११५

- भरपाईसाठी मंजूर प्रस्ताव : १०३ (यात गायी :५५, बैल :२९, वासरे : १९)

प्राप्त झालेले अनुदान

- ५५ गायींसाठी : १६ लाख ५० हजार रुपयांची मदत

- २९ बैलांसाठी : ७ लाख २५ हजार रुपयांची मदत

- १९ वासरांसाठी : ३ लाख ४० हजार रुपयांची मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT