MSRTC News esakal
नाशिक

MSRTC Income : एसटीची रोज कोटींची दिवाळी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळीच्‍या सुट्यांनिमित्त गेल्‍या काही दिवसांपासून शहर परिसरासह जिल्‍हाभरातील बसस्‍थानके प्रवाशांनी गजबजलेली आहेत. प्रवाशांनी लालपरीला पसंती दर्शविल्‍याने बसस्‍थानकांवर गर्दी बघायला मिळाली. अशात महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या नाशिक विभागाला या हंगामी काळात दरदिवशी सरासरी एक कोटी रुपयांची उत्‍पन्न मिळाले आहे. २१ ते ३१ ऑक्‍टोबर अशा अकरा दिवसांच्‍या काळात १० कोटी ९९ लाख ३६ हजार रुपये उत्‍पन्न मिळाले आहे. या कालावधीत सुमारे पंधरा लाख प्रवाशां‍नी एसटीने प्रवास केला. (11 crore revenue of MSRTC in 10 days of October Nashik News)

प्रवाशांच्‍या सुविधेकरीता दिवाळीच्‍या सुट्यांच्‍या काळात एसटी महामंडळातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच दिवाळीच्‍या कालावधीत एसटी महामंडळातर्फे हंगामी भाडेवाढदेखील लागू करण्यात आली होती. या कालावधीत वाढलेली प्रवासी संख्या आणि वाढीव भाडे यामुळे एसटी महामंडळाच्‍या तिजोरीत घसघशीत उत्‍पन्न प्राप्त झालेले आहे. नाशिक विभागातून सोडलेल्‍या जादा बसगाड्यांतून गेल्‍या २१ ते ३१ ऑक्‍टोबर अशा अकरा दिवसांच्‍या कालावधीत १० कोटी ९९ लाख ३६ हजार रुपये उत्‍पन्न मिळाले आहे.

१४ लाख ८० हजार ८२६ प्रवाशांनी अदा केलेल्‍या तिकिटाच्या माध्यमातून हा महसूल एसटी महामंडळाला प्राप्त झालेला आहे. दिवाळीच्‍या हंगामात सरासरी नाशिक विभागाला दैनंदिन एक कोटी रुपये उत्‍पन्न मिळाल्‍याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. आणखी काही दिवस प्रवाशां‍ची वर्दळ राहणार असल्‍याने या माध्यमातून महामंडळालादेखील घसघशीत उत्‍पन्न मिळणार आहे.

आगारनिहाय मिळालेले उत्‍पन्न

(२१ ते ३१ ऑक्‍टोबरदरम्‍यान)
नाशिक एक-----------२ कोटी २४ लाख ९५ हजार
पंचवटी-----------------८१ लाख ६ हजार
मालेगाव---------------८९ लाख ३० हजार
मनमाड----------------५७ लाख १३ हजार
सटाणा-----------------९५ लाख ३२ हजार
सिन्नर-----------------८९ लाख २१ हजार
नांदगाव---------------७० लाख ३८ हजार
इगतपुरी---------------५९ लाख ८३ हजार
लासलगाव------------६३ लाख १३ हजार
कळवण---------------९३ लाख ८० हजार
पेठ--------------------५२ लाख ७० हजार
येवला-----------------५४ लाख ५१ हजार
पिंपळगाव------------६८ लाख ०४ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT