Leopard Leopard
नाशिक

आमझर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ बकऱ्या ठार; पशुपालक हवालदील

हंसराज भोये

सुरगाणा (जि. नाशिक) : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमझर येथील पशुपालक चिंतामण गंगाजी वाघमारे (वय ४७) यांच्या तेरा बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात ११ बकऱ्या ठार, दोन बकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.


रविवारी (ता. ४) आमझर येथे आदिवासी पारंपरिक पद्धतीने रानभाजी खाण्याचा सण होता. त्यामुळे पशुपालकाने जंगलात चारण्याकरीता घेतलेल्या पंधरा ते वीस बकऱ्या जंगलात सोडून तो सण असल्याने निघून आला. नेहमीप्रमाणे अंधार पडला की बकऱ्या जंगलातून घराकडे परतायच्या. मात्र, शेतातील झापावर बकऱ्या परतल्याच नाहीत. तेरा बकऱ्या जंगलातील भोवर हेदीचा दरीत राहिल्या. याच दरीत खडकाची कपार असल्याने बिबट्याचा अधिवास असतो. रात्रीच्या सुमारास बकऱ्यांच्या कळपावर अचानक हल्ला चढवला. त्यात या बकऱ्या ठार झाल्या. हा भाग गुजरात राज्याचा सिमावर्तीलगतचा राखीव जंगलाचा आहे. त्यामुळे अशा घटना पावसाळ्यात नेहमीच घडत असतात. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता नाळे यांनी शवविच्छेदन केले असून, अहवाल वनविभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(11 goats killed in leopard attack in amzhar nashik news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIP Investment: 10,000 ची SIP बनवू शकते 1.86 कोटींचा फंड! पण 90 टक्के गुंतवणूकदार करतात मोठी चूक... स्टेप-अप फॉर्म्युला काय?

Women's T20 World Cup: गतविजेत्या न्यूझीलंडचा धुव्वा उडवत श्रीलंका चमकली; इंग्लंडने आयर्लंडला नमवले पण 'या' मोठ्या धक्क्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीत खळबळ? ठाकरे गटानंतर तुतारी गटातील खासदारांमध्येही अस्वस्थताआरोप

आपण इंस्टावर फेमस कपल! मेलोडी चॉकलेटनंतर मेलोनींचे मजेशीर विधान, PM मोदींसह फोटो पोस्ट अन्...

सोनू निगमला नेमकं झालंय तरी काय? आवाजावरही परिणाम झाल्याचा केलाय खुलासा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT