ST employee esakal
नाशिक

नाशिक : ST महामंडळाचे 11 संपकरी कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

युनूस शेख

जुने नाशिक : कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकाविणाऱ्या ११ संपकरी कर्मचाऱ्यांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध दर्शविला व त्यांना सोडून देण्याची मागणी केली.

एसटी महामंडळाचा संप अधिक चिघळत असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय बघता, बुधवारी (ता. १२) कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून त्यांच्याद्वारे बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय संपकरी कर्मचाऱ्यांनी काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर होण्यास तयार झाले होते. अशा कर्मचाऱ्यांना कामावर हजर होऊ नये, असे धमकावले जात होते. बुधवारपासून कंत्राटी कर्मचारी हजर झाल्यास त्यांना त्रास देणे, तसेच बसवर दगडफेक करण्यासारखे प्रकाराची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. असे होऊ नये, यासाठी त्यांच्याकडून पोलिसांना ११ जणांची नावे दिली होती. त्यावरून पोलिसांनी त्या अकरा जणांना विविध पोलिस ठाण्यामार्फत ताब्यात घेतले. गंगापूर पोलिसांनी चार, सरकारवाडा पोलिसांनी तीन, मुंबई नाका पोलिसांनी तीन, तर भद्रकाली पोलिसांनी एक, अशा ११ जणांना ताब्यात घेतले. यामुळे आंदोलनाठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिस ठाणे गाून पोलिसांच्या कारवाईचा विरोध दर्शविला. त्यांचा काही संबंध नसताना त्यांना घरातून ताब्यात घेतले. त्यांना सोडण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, त्यांना न्यायालयात हजर करून सोडून देण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या ११ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी हमीपत्र दिल्यानंतर न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. यात कैलास कुठे, नीलेश खैरे, महिंद्र तेजाळे, आवेश शेख, जगनसिंग झाला, ईश्वर वनसे, कैलास कराड, शशिकांत ढेपले, राजाराम मथुरे, भूषण चौक, रवींद्र निकाळे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात हादरवून टाकणारी घटना! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतलं फेविक्विक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Government Decision: सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयातील धावपळ संपणार, ५ प्रमुख नियमांत बदल; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

पाकिस्तानचा अजब कारभार ! एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही, FC मध्ये ३३.१० ची सरासरी... अशा खेळाडूला बनवलं बॅटींग कोच... कोण आहे तो?

Marathi Live Updates News: नागपूरमध्ये जुन्या वादातून सशस्त्र हल्ला

मी त्यांची वाईट बाजू पहिलीये... नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडियांचं सडेतोड वक्तव्य; म्हणाल्या, 'तो माणूस खूप...'

SCROLL FOR NEXT