NEET Exam Latest Marathi news esakal
नाशिक

NEET Exam : ‘नीट’ परीक्षेला 12 हजार विद्यार्थी जाणार सामोरे; 20 केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

NEET Exam : वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२३ परीक्षा रविवारी (ता. ७) नियोजित आहे. नाशिकमध्ये वीस केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.

सुमारे बारा हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार असून, तयारी अंतिम टप्यांत आलेली असल्‍याची माहिती मिळते आहे. (12 thousand students will face NEET exam Offline Exam at 20 Centers nashik news)

एमबीबीएस, बीडीएस, फिजिओथेरपी यासह अन्‍य सर्व प्रकारच्‍या वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षाला प्रवेशासाठी नीट २०२३ या परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. ‘एम्स’ मध्ये याच परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाईल.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता येत्‍या रविवारी (ता.७) दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून २० मिनीटे या कालावधीत ‘नीट २०२३’ ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, यासंदर्भातील सूचना वेळोवेळी जारी केलेल्‍या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्‍या शहराची माहिती देणारे सूचनापत्र नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे जारी केलेले आहे. नाशिकमध्ये वीस परीक्षा केंद्रांवर सुमारे बारा हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

दरम्‍यान विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची प्रतीक्षा कायम होती. विद्यार्थ्यांच्‍या एका समूहातर्फे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी समाज माध्यमांतून केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT