death esakal
नाशिक

पोकलॅन्ड मशिन खाली येऊन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू; मशिन चालक फरार

गटार व मलनिस्सारण योजनेचे कामाचे गटार खोदकाम चालु असलेल्या पोकलॅन्ड मशिनने मुले खेळणाऱ्या मोकळ्या जागेत जातांना योगेश गमे यास चिरडले.

कमलाकर अकोलकर

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर पाचआळी परीसरातील भांगरे गल्लीतील अखील योगेश गमे (वय १२) हा आदिवासी बालक मोकळ्या जागेत खेळत होता. ह्या भागात सुधारित गटार व मलनिस्सारण योजनेचे कामाचे गटार खोदकाम चालु असलेल्या पोकलॅन्ड मशिनने मुले खेळणाऱ्या मोकळ्या जागेत जातांना योगेश गमे यास चिरडले. यात या मुलाच्या मेंदूचा जागेवर चेंदामेंदा झाला.

ही घटना कळताच युवकांचे जथ्थे संतप्त होऊन या जागेकडे जाउ लागल्यावर वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदिप रणदिवे, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रभान जाधव व अश्विनी टिळे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या बालकास प्रथम त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय व तेथून नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

मोकळ्या जागेत हे मशिन का नेण्यात आले? या बाबत संशय...

ह्या भागात अरुंद रस्त्यात खोदकाम सुरु असून विद्युत पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे बाहेरुन येणारी वाहने यात पडल्याचे येथील रहिवासी व माजी नगरसेवक मोहन भांगरे यांनी सांगितले. मोकळ्या जागेत हे मशिन का नेण्यात आले या बाबतीत संशय व्यक्त केला जात आहे. येथे घाईने काम उरकुन घेण्यासाठी तीन मशिन लावल्या असुन तीन्हींचे चालक फरार झाले आहेत. या कामांच्या दर्जा बाबतही स्थानिकांची नाराजी असतांना ते परतण्याची घाई सर्व दर्शवित आहे. चौतीस कोटी रुपयांची ही सुधारित गटार योजना पालिकेच्या मार्फत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: बीएमसी रणांगणात महायुतीचा मास्टरप्लॅन! भाजप आणि शिंदेसेनेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; कोण किती जागा लढवणार?

Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

Bihar Train Accident : बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात ! मालगाडीचे डबे पुलावरुन नदीत कोसळले... रेल्वे वाहतूक ठप्प

शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांची माहिती तयार! ३० जून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश; नियमित कर्जदारांना मिळणार ‘हा’ लाभ

आजचे राशिभविष्य - 28 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT