12 year old Shravani discover an asteroid in space nashik news esakal
नाशिक

Nashik News: 12 वर्षीय श्रावणीने शोधला अंतराळात लघुग्रह; जागतिक स्तरावर संशोधन, अभ्यास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: इस्रो मॅजिका या आंतरराष्ट्रीय अंतराळ शैक्षणिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या बारा वर्षीय श्रावणी पांढरे हिने अंतराळातील लघुग्रह शोधला आहे. नासा पार्टनर असलेल्या खगोलशास्त्र शोध मोहिमेत लघुग्रहांच्या निरीक्षणात तिने उल्लेखनीय कामगिरी केली. (12 year old Shravani discover an asteroid in space nashik news)

पृथ्वीच्या जवळचा व मुख्य बेल्टमधील लघुग्रह तिने शोधला असून त्‍यास नासा पार्टनर असलेल्‍या ‘आयएएससी’ ने प्राथमिक दर्जा दिला आहे. या लघुग्रहाचे जागतिक स्तरावर संशोधन, अभ्यास केला जाणार आहे.

इस्रो मॅजिका या इस्रोच्या नोंदणीकृत स्‍पेस ट्यूटर संस्‍थेच्‍या पहिल्या सुपर १ हजार ज्युनिअर सायंटिस्‍ट प्रशिक्षणातदेखील श्रावणीची निवड झाली आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या लघुग्रह शोध मोहीम कार्यक्रमात तिने हे संशोधन केले आहे. इस्रो मॅजिका ही पृथ्वीवरील खगोलशास्त्रीय शोध घेणारी आणि अवकाश, विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये विशेष कामगिरी करणारी मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आहे.

सुमारे ८० देशात ही संस्था विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, अभियांत्रिकी यावर प्रमाणित करण्यात आली असून या संस्थेमध्ये नाशिकची श्रावणी पांढरे प्रशिक्षण घेत आहे. सध्या ती सेंट लॉरेंस हायस्कूल येथे इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेते आहे.

इस्रो मॅजिका या संस्थेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र शोध मोहिमेत इस्रो मॅजिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शास्त्रज्ञ प्रवीण वाकोडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व अंतराळ शिक्षिका शिखा सिंग यांच्यासमवेत नियुक्त केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नऊ प्रशिक्षणार्थीमध्ये श्रावणी पांढरेचा समावेश होता.

खगोलशास्त्रीय संशोधनाचा प्रवास करताना तिने पृथ्वीच्या जवळच्या लघुग्रहाच्या निरीक्षणात कौतुकास्पद कामगिरी करून लघुग्रह शोधला. याबद्दल तिला नासा पार्टनर असलेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय शोध सहयोगी संस्थेने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. तसेच तिला रॉकेट लाँचिंगच्या कामगिरीत ज्युनिअर सायंटिस्‍ट म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष कामगिरीबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT