Family members, villagers and village panchayat officials along with mothers welcomed the birth of girls here. esak
नाशिक

Nashik News : देशवंडी ग्रामपंचायतीद्वारे 13 बालिकेंचा सन्मान; नवजात बालकांना चांदीचे दोन कडे भेट

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात नकोशी असलेलीच चित्र बदलले असून. अलीकडे मात्र परिस्थिती बदलत असून मुलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं होत आहे. यामुळे बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना संदेश दिला जात असून, सामाजिक बदलाला चालना मिळत आहे. सिन्नर तालुक्यातील देशवंडी नुकतंच मुलींच्या जन्माचे करण्यात आले आहे. (13 girls honored by Deshwandi Gram Panchayat silver gift for newborn babies Nashik Latest Marathi News)

मुलीला घरी आणण्यासाठी फुलांचे तोरण, रस्त्यांवर फुलांच्या पायघड्या असा नावीन्यपूर्ण उपक्रम देशवंडी येथील ग्रामस्थांनी राबवून तेरा कुटुंबीयांतील मुलींचे जंगी स्वागत केले आहे. तसेच, २०२१-२२ या वर्षात जन्माला आलेल्या मुलींना प्रत्येकी दोन चांदीचे कडे देण्यात आले. याशिवाय मातांचा साड्या देऊन सन्मान करण्यात आला. गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संग्राम कातकडे, शिवसेनेचे युवा नेते संजय सानप यांच्या हस्ते चांदीचे कडे वितरित करण्यात आले.

सरपंच दत्ताराम डोमाडे, उपसरपंच सुमन कापडी, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग डोमाडे, सुभाष बरके, नवनाथ बरके, विठ्ठल मेंगाळ, ग्रामसेविका प्रीतम पगारे, भाऊसाहेब कापसे, ज्ञानेश्वर नागरे, शिवनाथ आव्हाड, मुकेश घुगे, यादव कापडी, सोमनाथ आव्हाड, नवनाथ कापडी, भाऊराव कापडी, भाऊसाहेब कापडी, संदीप कापडी, अंगणवाडी कर्मचारी साळू नागरे, वैशाली कर्डक, ज्योती शिरसाट, आशा सेविका सिंधूबाई कापडी, लता सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन वाढवायला हवे. त्याला उच्च शिक्षण, चांगले आरोग्य व चांगले भविष्य देण्याचा नेटाने प्रयत्न प्रत्येक कुटुंबातून झाल्यास भविष्यात मुलीच्या कार्यकर्तृत्वातून त्या कुटुंबाला समाजात वेगळी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे पालकांनी सांगितले.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

पहिली बेटी धनाची पेटी

ग्रामपंचायतीने मुलींच्या जन्माचे स्वागत केले. एका मुलीस सहा ग्रॅम वजनाचे प्रत्येकी दोन कडे वितरित केले. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करण्यात आला. मुलींचा जन्मदर घटू नये, मुलगा व मुलगी यात समानता असावी, याबाबत ग्रामस्थांच्या मनात सकारात्मक विचार यावा या उद्देशाने ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी चांदीचे कडे वाटून तेरा मुलींच्या जन्माचे स्वागत केले. यावेळी गावात सर्व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिली बेटी धनाची पेटी या वाक्याने देशवंडी येथील पालकांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आदर्श घेण्यासारखा उपक्रम : मुरकुटे

मुलींच्या जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. उपक्रमातून प्रत्येक ग्रामस्थापर्यंत मुलींच्या जन्माच्या स्वागता बाबत सकारात्मक संदेश जाऊ शकेल. प्रत्येक गावात असा उपक्रम व्हावा असे मत गटविकास अधिकारी बीडीओ मुरकुटे यांनी व्यक्त केले. संजय सानप यांनी प्रत्येक गावात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले. माजी उपसभापती संग्राम कातकाडे यांनी उपक्रमाचा मुख्य उद्देश तळागाळापर्यंत पोचवण्याचे आवाहन केले.‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT