Liquor Sale esakal
नाशिक

Liquor Sale : तळीरामांमुळे सरकारी तिजोरी मालामाल!

मद्यविक्रीच्या माध्यमातून १३ हजार कोटींचा महसूल

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : दारूच्या एका प्यालामुळे आजही अनेक तरुणांच्या आयुष्याची आणि पर्यायाने त्यांच्या संसाराची दुरवस्था होत आहे. असे असले तरी तळीरामांमुळे सरकारी तिजोरी मालामाल झाल्याचे राज्य उत्पादन शुल्काच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यंदा नोव्हेंबरअखेर मद्यविक्रीच्या माध्यमातून सरकारला सुमारे १२ हजार ९५२ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल मिळाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे.

कोरोनाकाळात राज्य सरकारची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. उत्पन्नाअभावी अनेक विकासकामे रखडली. सरकारच्या विविध प्रकारच्या अनुदानात कपात करण्यात आली. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्याच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी दिल्याची बाब अधोरेखित झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२२- २३ या आर्थिक वर्षाची नोव्हेंबर अखेर आकडेवारी नुकतीच जाहीर केली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महसुलीत तब्बल ३२.८६ टक्के वाढ झाली आहे. २०२१- २२ या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ९७४८.९६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदा मद्य विक्रीचा आलेख उंचावल्याने सरकारच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी

IPL Delhi vs Chennai News: दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर दैव बदलणार?; धोनी नसला तरी चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला

Akola News: टॅंकरवर वाढली शहराची निर्भरता; चारही झोनमध्ये दिवसाला १६ ते १८ टॅंकरच्या फेऱ्या

Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT