Bogus Seed Sale
Bogus Seed Sale esakal
नाशिक

Nashik Bogus Seed Sale: बोगस बियाण्यांमुळे 15 शेतकऱ्यांना फटका! कंपन्यांवर कारवाई करणार कधी?

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bogus Seed Sale : पावसाअभावी निफाड तालुक्यातील खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटले असून पेरणी रडतखडत सुरू आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून काही ठिकाणी पेरणी केलेले बियाणेच उगवलेले नाही.

अशा पंधरा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याचे पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. (15 farmers hit by bogus seeds When will action taken against companies nashik)

कृषी विभागाने मोठा गाजावाजा करून बोगस बियाणे, खतांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके नेमली होती, तरीही तालुक्यात बोगस खते विकली जात असल्याचे उघड झाले. आता तर बोगस बियाण्यांमुळे थेट पीकच न उतरल्याने कृषी विभाग नेमका काय करत होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

निफाड तालुक्यात जून महिना तसा कोरडाच गेला. जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीचा धोका पत्करला. पावसामुळे उशिराने पेरणी झाली. त्यात आता शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्यांच्या चुकीमुळे वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे.

काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात सोयाबीनच्या तक्रारी येत आहे. निफाड तालुक्यात सुमारे २५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यातील पंधरा शेतकऱ्यांनी बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.

कृषी विभागाकडून तक्रारीचे दखल घेऊन पंचनामे केले आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे उगवले नाही, तर त्याचा मोठा फटका बसतो. पंचनाम्यानंतर महाबीजने शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही कंपन्यांनी बियाणे बदलून न देता हात वर केले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ग्राहक न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

यंदा शेतकऱ्यांवरच अगोदरच निसर्गाचे संकट आहे. त्यात आता बियाणे उगवलेच नाही हे नवे संकट उभे आहे. ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही, अशांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे.

जुलै अखेरीस दुबार पेरणी केल्यानंतर हातात काय राहील असाच प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. कंपन्यांच्या गलथानपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

"बियाण्याची उगवण झाली नाही, अशा पंधरा तक्रारी तालुक्यात प्राप्त झाल्या होत्या. त्यावर पंचनामे करण्यात आले. त्यातील काही शेतकऱ्यांना कंपनीने बियाणे बदलून दिले आहे. उर्वरित काही कंपन्यांकडे शेतकऱ्यांना नव्याने बियाणे मिळवून देण्याचा प्रयत्न आहे."

- सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड.

"उगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांना दिले गेले ही गंभीर बाब आहे. याबाबत राज्य बियाणे उपसमितीच्या सभेत मुद्दा उपस्थित करणार आहे. शेतकऱ्यांना संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी." - खंडू बोकडे, सदस्य, राज्य बियाणे उपसमिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT