Dengue Infection esakal
नाशिक

Nashik Dengue News: शहरात नव्याने डेंगीचे 150 रुग्ण

डिसेंबरच्या दोन आठवड्यात शहरात नव्याने डेंगीचे दीडशे रुग्ण आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue News : डिसेंबरच्या दोन आठवड्यात शहरात नव्याने डेंगीचे दीडशे रुग्ण आढळून आले आहे. बाधित त्यांची संख्या एकूण ११३५ झाली आहे.

त्या व्यतिरिक्त डेंगीने तीन बळी गेले असून, वैद्यकीय विभागाचा डेंगीची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा फोल ठरला आहे. (150 new cases of dengue in city nashik news)

मुख्यत्वे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पावसाळा संपल्यानंतर डेंगीचा प्रादुर्भाव जाणवतो. यंदा डिसेंबरमध्येदेखील डेंगीने कहर कायम ठेवला आहे. ऑगस्ट महिन्यात डेंगीचे ४७ रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात २६१ रुग्ण आढळून आले, तर ऑक्टोबर महिन्यात १९३ बाधित आढळले.

नोव्हेंबर महिन्यात पावणेतीनशे नागरिकांना डेंगीची बाधा झाली. डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात दीडशे नवीन बाधित रुग्ण आढळले आहे.

एकूण डेंगी बाधितांची संख्या ११३५ वर गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात नाशिक रोड विभागातील आनंदनगर परिसरातील एकाचा डेंगीने मृत्यू झाला.

त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सिडकोतील डीजीपीनगर कामटवाडे भागातील, तर पंचवटीच्या म्हसरूळ विभागातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला डेंगीची लागण होऊन मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत डेंगीने तिघांचा बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT