old building
old building google
नाशिक

नाशिक शहरात १५१ घरे अतिधोकादायक

विक्रांत मते

नाशिक : शहरातील धोकादायक घरांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात एक हजार २०२ पैकी १५१ घरे, वाडे अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिधोकादायक असलेल्या या घरांमध्ये किती कुटुंबे वास्तव्याला आहेत, त्या कुटुंबांना अन्यत्र हलविता येईल का या संदर्भात अहवाल तत्काळ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (151 buildings in Nashik city are very dangerous for the residents)


महापालिकेकडून दर वर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक घरांना नगररचना विभागामार्फत नोटिसा बजावल्या जातात; परंतु नोटिसा बजावण्याचा हा फक्त सोपस्कार पार पाडला जातो. वास्तविक धोकादायक घरे जाहीर केली असताना त्यातील कुटुंबांना बाहेर काढण्याची जबाबदारीदेखील आहे. परंतु महापालिकेकडून टाळाटाळ होते. पावसाळा संपल्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर चौकशी, वादविवाद होतात; परंतु कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. या वर्षीदेखील नगररचना विभागाने पावसाळा तोंडावर आल्याने शहरात एक हजार ४५६ धोकादायक मिळकती, वाडे व घरे धोकादायक असल्याचे जाहीर करत नोटिसा बजावल्या. त्यात सर्वाधिक धोकादायक ७१७ मिळकती धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, आयुक्त कैलास जाधव यांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक घरे, जुने वाडे, इमारतींच्या फेरसर्वेक्षणाच्या सूचना दिल्या.

धोकादायक मिळकतींचा अहवाल तयार करताना किती घरे अतिधोकादायक आहेत, किती घरांची दुरुस्ती करून राहण्यायोग्य आहेत, या संदर्भातील वर्गवारीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहा विभागांत एक हजार २०२ धोकादायक घरे असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातील ६५ घरांची पावसाळापूर्व दुरुस्तीची कामे करण्यात आली. साडेतीनशे कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करून दुरुस्ती करणे शक्य आहे. ५०६ घरांमध्ये जागेवर दुरुस्त करणे शक्य आहे, तर १५१ मिळकती, जुने वाडे, इमारती अतिधोकादायक असून, कुठल्याही क्षणी कोसळतील अशी स्थिती असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. सहा विभागांमध्ये धोकादायक घरांची संख्या पश्‍चिम विभागात ६४२ आढळून आली. पंचवटी विभागात १९५, नाशिक रोड विभागात १२८, पूर्व विभागात ११७, सातपूर विभागात ७०, तर सिडको विभागात ५८ घरे धोकादायक आहेत.


कुटुंबांची संख्या किती?

अतिधोकादायक असलेल्या १५१ मिळकती, जुन्या वाड्यांमध्ये किती लोक वास्तव्याला आहेत. कुटुंबांची संख्या किती आहे. या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.
(151 buildings in Nashik city are very dangerous for the residents)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2024

Monsoon : केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Sakal Vastu Expo : स्वप्नातील घर आता सत्यात अवतरणार

Illegal Hoarding : पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

SCROLL FOR NEXT