crime.jpg 
नाशिक

ट्रकसह तब्बल १७ लाखांचा मद्यसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विनोद बेदरकर

नाशिक : चांदवड - देवळा मार्गावर खेलदरी शिवारात परराज्यातील इसुझू कंपनीची विदेशी दारू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तब्बल ट्रकसह १७ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. राज्य उपादन शुल्क विभागाच्या कळवण उपविभागातर्फे चांदवड-देवळा मार्गावर ही कारवाई करण्यात आली.

असा आहे प्रकार

चांदवड-देवळा मार्गावर खेलदरी शिवारात परराज्यातील इसुझू कंपनीची विदेशी दारू येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मनोहर अंचुळे, उपअधीक्षक बी. एन. भुतकर निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रमेश शिवराम सोनवणे, महेंद्र सोनार, दत्तात्रय चौरे, मनोहर गरुड, दीपक आव्हाड, महेश सातपुते, गणेश शेवगे, अवधूत पाटील, पांडुरंग वाईकर यांच्या पथकाने सहाचाकी ट्रक (एमएच २०, डीई ०४६२) तपासला असता त्यात मध्य प्रदेशातील विदेशी दारू हस्तगत केली. त्यात, ७५० मिली रॉयल नाइट व्हिस्कीचे ११५ बॉक्स, १८० मिलीचे रॉयल सिलेक्ट व्हिस्कीचे २८ बॉक्स असा एकंदर १४३ बॉक्स दारू माल ट्रकसह जप्त केला. या प्रकरणी शिवाजी बाबूलाल चौधरी (पडावद, जि. धुळे) याला अटक करण्यात आली.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : चिपळूण उड्डाणपुलाची आज पाहणी; नागरिकांच्या तक्रारीची दखल, कामाच्या दर्जाबाबत शंका

Land Records: जमीन मालकांसाठी मोठी बातमी! ‘क’ प्रतीवर अक्षांश-रेखांश असल्यास पुन्हा मोजणीची गरज नाही, भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT