A total of eighteen Amrit Kalash from the district along with Nashik Municipal Corporation left for Mumbai on Thursday as part of the 'Majhi Mati- Maja Desh' campaign. esakal
नाशिक

Majhi Mati Majha Desh : जिल्ह्यातील 18 अमृतकलश मुख्य कार्यक्रमासाठी रवाना

सकाळ वृत्तसेवा

Majhi Mati Majha Desh : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘माझी माती-माझा देश’ अभियानांतर्गत नाशिक महापालिकेसह जिल्ह्यातील एकूण १८ अमृतकलश गुरुवारी (ता. २६) दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आले.

महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बसला हिरवा झेंडा दाखवून नाशिक-मुंबई-दिल्ली अमृतकलश यात्रेचा प्रारंभ केला. (18 Amrit Kalash of district dispatched for main event nashik news )

या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्याचा अमृतकलश हा जिल्हास्तरावर आणण्यात आला. यात संकलित अमृतकलश २७ ऑक्टोबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ठेवण्यात येतील. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचा या कार्यक्रमात सहभाग आहे.

अभियानाचे समन्वयक महापालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, उपजिल्हाधिकारी झिरवाळ, जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक व मालेगाव महापालिकेचे दोन तसेच १६ नगर परिषदांच्या एक आणि सर्व १५ तालुक्यांतील एक याप्रमाणे एकूण १८ अमृतकलश मुंबई येथील कार्यक्रमात असतील.

दिल्ली येथील कार्यक्रम ३१ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये नाशिकमधील ३६ युवक सहभागी होतील. नाशिक महापालिकेतर्फे प्रा. ज्येष्ठ कलावंत प्रथमेश जाधव आणि इंजिनिअर नितीन रायते यांची या यात्रेसाठी निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT