18 tankers quench thirst of 15 villages! esakal
नाशिक

Water Crisis | 18 टँकरने 15 गावांची भागतेय तहान!

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : दुष्काळी येवला तालुक्यात यंदा जोरदार पाऊस (Rain) होऊनही तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत आहे. सद्यस्थितीत तब्बल १३ गावे, दोन वाड्याची तहान १८ टँकरच्या खेपाद्वारे रोज भागविली जात आहे. टंचाईग्रस्त १४ वाड्या व २ गावांचे टॅंकरचे प्रस्ताव पुन्हा आले आहेत.

राज्यातील ९४ टंचाईग्रस्त तालुक्यापैकी येवला (Yeola) वरच्यास्थानी आहे. येथे कितीही पाऊस पडला तरी उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता कमी होत नाही. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ५७ गावे वस्त्या टँकरमुक्त झाल्या ही समाधानाची बाब आहे.

सायगाव व राजापूर ही सलग २० ते २५ वर्षे टँकरवर तहान भागवणारी गावे पाणी योजनांमुळे टँकरमुक्त झाल्याचा आनंद आहे. मात्र अजूनही ५० ते ८० गावे व वस्त्यांसाठी उन्हाळ्यात टंचाईच्या वणव्यात भाजून निघतातच. त्यामुळे प्रत्येक उन्हाळा अनेक गावांसाठी टॅंकरने तहान भागविणारा ठरतो.

तालुक्याची पर्जन्याची वार्षिक सरासरी ५१२ मिलिमीटर असताना यंदा तब्बल ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंगराळी उत्तर पूर्व भागात तर पावसाचे प्रमाण सर्वाधिक असतानाही पाणी आटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

यामुळे तालुक्यात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच टंचाईचा (Water Crisis) उद्रेक झाला आहे. विशेष म्हणजे पालखेड डाव्या कालव्याला मागील दोन महिन्यात दोनदा आवर्तन आल्याने लाभक्षेत्रातील गावांची टंचाई बहुतांशी सुटली आहे. मात्र कुठल्याही कालव्याचा व पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसलेले गावे मात्र पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहात आहे. सद्यस्थितीत ममदापूर येथे तीन तर आहेरवाडी येथे दोन टॅंकरच्या खेपा रोज सुरू आहेत. जायदरे, हडप, सावरगाव, कोळगाव, वाईबोथी, खरवंडी, भुलेगाव, कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, तळवाडे येथील शिवाजीनगर, रेंडाळे, देवदरी, आडसुरेगाव, पिंपळखुटे बुद्रुक येथील पगारे व पाणलोट वस्ती या ठिकाणी टॅंकरने तहान भागविली जात आहे.

तालुक्यासाठी शासकीय तीन तर खासगी चार टँकर कार्यरत असून शहरालगतच्या नांदूर येथील विहिरीतून हे टँकर भरले जातात. याशिवाय नव्याने नगरसूल येथील दहा वाड्या-वस्त्या, राजापूर येथील तीन वस्त्या, सोमठाण जोश, देवठाण व सायगाव येथील महादेव वाडी येथील टँकरचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत अशी माहिती पाणीपुरवठा प्रमुख सजन घनवट यांनी दिली. दरम्यान, अजूनही मे महिना बाकी आहे, त्यामुळे टँकरग्रस्त गावांची व वाड्यांची संख्या अजूनच वाढणार हे नक्की.

"प्राप्त प्रस्तावानुसार गावांची टंचाईची पाहणी करून टँकर सुरू केले आहेत. ग्रामपंचायतकडून पंचायत समितीकडे आलेले प्रस्ताव तत्काळ मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक असल्याने तिसऱ्या टप्प्यात टँकरग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने उपाययोजनेचे नियोजन केलेले आहे."

- अन्सार शेख, गटविकास अधिकारी, येवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT