Raj Thackeray ESAKAL
नाशिक

Raj Thackeray In Nashik: सत्ता हातात द्या मशिदीवरील सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरेंचे नाशिकमध्ये दमदार भाषण

18th anniversary of MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले.

कार्तिक पुजारी

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपला टोमणा मारला. मला माझी पोरं कडेवर घ्यायचीत. दुसऱ्याची पोरं कडेवर घ्यायची नाहीत, असं म्हणत त्यांनी राजकीय पक्षांना टोला लगावला.(18th anniversary of Maharashtra Navnirman Sena MNS chief Raj Thackeray )

राजकारणासाठी सोशल मीडियाचा कसा वापर केला गेला पाहिजे हे कळायला हवे. एक खूप शक्तीशाली माध्यम तुमच्याकडे आहे. सोशल मीडियाचा वापर कार्यकर्त्यांनी केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो. माझेही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. मी गाडीतून खाली उतरलो की मागे गाणं 'आराररारा..आरारं..रारा' वाजतं. याचा अर्थ काय असतो. असं काही लोक काहीही पाहत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

सोशल मीडियाचा वापर कसा करायचा यासाठी व्याख्याने घेण्याचं ठरवलं आहे. राजकारणात काही लागत असेल तर तो म्हणजे संयम. आज जे राजकीय पक्ष दिसत आहेत ते पक्ष कधीपासून आहेत. सगळ्यांना वाटतं सगळं श्रेय पंतप्रधान मोदींचं आहे. पण, ते पूर्णपणे खरं नाही. यासाठी अनेक लोकांनी श्रम घेतले आहेत. १९५२ मध्ये जनसंघाची स्थापना झाली अन् १९८० मध्ये त्याचा भारतीय जनता पक्ष झाला, असं ठाकरेंनी सांगितलं

गुढीपाडव्याच्या दिवशी खूप गोष्टी बोलणार आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर सभा घेणार आहे. आतापर्यंत एकदी आंदोलन अर्धवट सोडलं नाही. पण, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? माझ्या हातात सत्ता द्या सर्व भोंगे सरसकट बंद करतो. समुद्रावर अनधिकृत दर्जा बांधत होते. एका रात्रीत पाडायला लावले, असं ठाकरे म्हणाले.

भाजपमधील अनेक नेत्यांनी मेहनत केली तेव्हा कुठे सत्ता आली. गेल्या अठरा वर्षांमध्ये मी माझे भाग्य समजतो. की, अनेक चढउतार आले, पण तुम्ही कायम माझ्यासोबत राहिलात. यश कुठं जातंय. यश मिळणार म्हणजे मिळणार. मी तुम्हाला ते देणार पण, थोडा संयम ठेवा, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.

लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीबाबत राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मनसे नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत गुप्त बैठका पार पडल्या होत्या. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होईल का? असे प्रश्न सर्वांना पडला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

पुण्यात PMPL बसची दुचाकीला मागून धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT