crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : बोलेरो कारसह 2 दुचाकींची चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातून साडेतीन लाखांच्या बोलेरो कारसह दोन दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याच्या घटना घडल्या. सुनील मोहन यादव (रा. प्रेस्टीज पार्क, शंकरनगर, द्वारका) यांची ३ लाख ५० हजारांची बोलेरो कार ( एमएच ४३ एक्स ४६७२) राहत्या इमारतीच्या ठिकाणी पार्क केली होती.

गुरुवारी (ता. २) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सदर बोलेरो वाहन चोरून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 bikes along with Bolero car stolen Nashik Crime News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

प्रभंजन सुनील सेामवंशी (रा. बालाजी अपार्टमेंट, भाभानगर) यांची दुचाकी (एमएच- १५- एचएन- ५००७) १ फेब्रुवारीला मध्यरात्री भाभानगर येथील महाराष्ट्र फूड्स या दुकानासमोर पार्क केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज राजेंद्र बनसोड (रा. हेगडेवार चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांची दुचाकी (एमएच- १४- सीझेड- २६८१) खेतवाणी लॉन्स समोरील निशिगंधा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. बुधवारी (ता.१) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT