Bribe crime esakal
नाशिक

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

या दोघांनी प्रत्येकी 15 हजार रुपये असे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

नरेश हाळणोर

नाशिक : अहमदनगर येथील एका कारखान्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे संमती पत्र देण्यासाठी नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व क्षेत्र अधिकारी या दोघांनी प्रत्येकी 15 हजार रुपये असे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी मध्यरात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

नाशिकचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी, क्षेत्र अधिकारी कुशल मगन्नाथ औचरमल असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांचे नगर येथे गोल्ड ज्वेलर्स कौन्सिलिंग क्लस्टर संस्थेच्या हॉल मार्किंग सेंटरसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र पाहिजे होते. त्यासाठी लाचखोर दोघा अधिकाऱ्यांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने पडताळणी केल्यानंतर मंगळवारी रात्री नाशिक येथील उद्योग भवन मध्ये असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात दोघा अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी मध्यरात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT