nmc election
nmc election esakal
नाशिक

हरकतीसाठी 2 दिवसांची मुदतवाढ; शिवसेना, मनसतर्फे NMC आयुक्तांना साकडे

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिका निवडणूकीसाठी (NMC election) तयार केलेल्या मतदार यादीत (Voter List) घोळाच्या तक्रारी सुरूच असून, वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २९) शिवसेना (Shiv sena), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) महापालिका आयुक्तांना (NMC commissioner) निवेदन देत मुदतवाढीची मागणी केली. दरम्यान, सायंकाळी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्यावर हरकती (Objection) घेण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिल्याने इच्छुकांना हरकती घेण्याला दोन दिवस अधिक संधी मिळणार आहे. (2 day extension for objections Shiv Sena MNS ask to NMC Commissioner Nashik News)

महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याचा सिलसिला बुधवारीही सुरुच होता. सर्वाधिक तक्रारी सिडको विभागात आहे. दरम्यान, इतरही अनेक विभागातून नाव गायब आहेत. इतर प्रभागातील नाव समाविष्ट झाल्याच्या तक्रारी सुरुच होत्या. जिल्ह्यातील मतदार यादीतील घोळाबाबत तब्बल वर्षापासून जिल्हा निवडणूक विभागाकडे पाठपुरावा करणाऱ्या शिवसेनेने पुन्हा महापालिका आयुक्तांना निवेदन देत हरकती घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली.

शिवसेनेचे निवेदन

२३ जूनला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांत अनेक त्रुटी आहेत. प्रभाग हद्दीनुसार मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने याबाबत आक्षेप नोंदविण्यासाठीची मुदत १५ दिवसांनी वाढवून मिळावी, या आशयाचे निवेदन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातर्फे महापालिका आयुक्त रमेश पवार यांना माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, उपमहानगरप्रमुख नाना पाटील, संदीप लभडे आदींनी निवेदन दिले. दुसऱ्या प्रभागातील नावे त्या प्रभागात समाविष्ट झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे.

महापालिकेने प्रभागरचनेनुसार केलेले जनगणनेचे ब्लॉक उपलब्ध असतानाही प्रभागनिहाय मतदार याद्यांत चुका झाल्या आहेत. दुरुस्तीसाठी तसेच हरकती नोंदविण्यास दिलेला कालावधी खूपच कमी आहे. ४४ प्रभागातून या सदोष प्रारूप मतदार याद्यांबाबत प्रचंड नाराजीचा सूर असल्याने त्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी पुरेसा अवधी मिळण्यासाठी ही मुदत आणखी १५ दिवसांची वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रभागांचे आरक्षणही धोक्यात: मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हरकती नोंदविण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. शहराध्यक्ष दिलीप दातीर, समन्वयक सचिन भोसले, संतोष कोरडे, विक्रम कदम, अक्षय खांडरे, भाऊसाहेब निमसे, नितीन माळी, संदीप भंवर, कौशल पाटील आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त रमेश पवार यांना निवेदन दिले. प्रारूप मतदार याद्या उशिराने संकेत स्थळावर प्रसिद्ध झाल्या. तांत्रिक घोळामुळे तीन दिवस वाया गेले. मतदार याद्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. विधानसभा मतदार याद्यातील अनेक मतदारांची नावे वगळली आहेत. यादीत दुबार नाव आहेत, शेजारील प्रभागांतील मतदारांची नावे समाविष्ट आहेत. मतदार याद्या बनवताना नावांची हेरफेर झाल्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मतदारांच्या संख्येच्या हिशोबाने जाहीर करण्यात आलेले प्रभागांचे आरक्षणही धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या हेतूवर संशय यावा असाच प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT