2 dead in pick up collision on Amalner Phata nashik accident news esakal
नाशिक

Nashik Accident News : आंबानेर फाट्यावर पीकअपच्या धडकेत 2 ठार

वणी-सापुतारा रस्त्यावर अंबानेर फाट्याजवळ पीकअपने दुचाकीस दिलेल्या धडकेत सुरगाणा तालुक्यातील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : वणी-सापुतारा रस्त्यावर अंबानेर फाट्याजवळ पीकअपने दुचाकीस दिलेल्या धडकेत सुरगाणा तालुक्यातील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. (2 dead in pick up collision on Amalner Phata nashik accident news)

गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेतमजूर दयाराम चिम महाले (वय ३० रा. महालपाडा गुही, ता. सुरगाणा) व जयवंत शांताराम बंगाळ (बंगाळपाडा गुही, ता. सुरगाणा) दुचाकीवरून नाशिकहून धार्मिक कार्यक्रमासाठी घरी महालपाडा येथे जात होते.

पाठीमागून भरधाव येणाऱ्या पीकअप (एमएच ४१, एयू ६६१९)ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. अपघातग्रस्त दुचाकीने पेट घेऊन खाक झाली. मृतांना वणी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेले.

रात्री उशिरा वैद्यकीय अधिकारी डॉ. सिंगल व डॉ. गाडे यांनी शवविच्छेदन केले. याबाबत वणी पोलिसांत पीकअप चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीवरील मृत दोघे नाशिकला कंपनीत कामाला होते. शुक्रवारी (ता. २) धार्मिक कार्यक्रम असल्याने घरी जात असताना, त्यांच्यावर काळाने घाला घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT