Nandur Madhyameshwar dam 
नाशिक

Nashik News: नांदूरमध्यमेश्वरचे 2 गेट उघडले; 2 दिवस सुरू राहणार विसर्ग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील गंगापूर, कडवा, मुकणे व दारणा धरणातून सोडलेले पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून ‘जायकवाडी’ला सोडण्यासाठी दोन गेट उघडले आहेत. दोन दिवस येथून पाण्याचा विसर्ग सुरू राहील.

पाणी सोडण्याच्या वेळी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पाटबंधारे विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (2 gates were opened to release water from Nandur Madhmeshwar dam to Jayakwadi nashik news)

नांदूरमध्यमेश्वरमधून सोमवारी (ता. २७) सकाळी १६ हजार ७८१ क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पुन्हा विसर्गात कपात करण्यात येऊन १२ हजार ६२० क्युसेक वेगाने करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली. नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस हा विसर्ग सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी कार्यकारी अभियंता मनोज डोके, जायकवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक नखाते, निफाड तहसीलदार शरद घोरपडे, प्रशांत गोवर्धने, वैभव आडसूळ, योगेश राठोड, शरद नागरे, कचरू कातकाडे, टी. एस. मनवर उपस्थित होते.

संनियंत्रण समिती स्थापन

जिल्ह्यातील धरणातून ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्यात आल्यावर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व अधिकचे पाणी ‘जायकवाडी’ला जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आवश्यक तेवढेच पाण्याचा विसर्ग होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीत नाशिकचे प्रांत जितीन रहेमान, इगतपुरी प्रांत रवींद्र ठाकरे, निफाड प्रांत हेमांगी पाटील यांचा समावेश आहे.

असा होणार विसर्ग

धरण प्रकल्प- दलघफू

गंगापूर : ५००

मुकणे : ४८४

कडवा : ३००

दारणा : १८५९

एकूण : ३१४३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT