police esakal
नाशिक

Nashik News: वाड्याच्या 2 मैत्रिणी रागात नाशिकला आल्या अन दिंडोरी पोलिसांनी सुखरूप घरी पोहचवल्या

संदीप मोगल

Nashik News : आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न होवू न शकल्याने आत्महत्येचा विचार करणाऱ्या वाडा येथील मैत्रिणीचे मन वळवून तिला नाशिक सोबत घेवून आलेल्या व रात्रीच्या वेळी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे गावात भेदरलेल्या अवस्थेत फिरत असणाऱ्या दोघी मैत्रीणीची सतर्क ग्रामस्थांनी वेळीच पोलिसांना खबर दिली व पोलिसांनी तातडीने पावले उचलत त्यांना काही तासात त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहचवले आहे. (2 girlfriends of Wada ran away from home in anger and Dindori police brought them home safely Nashik News)

याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 4 सप्टेंबर 2023 रोजी रात्रीचे वेळी नाशिक दिंडोरी रोडवर पिंपळणारे या गावांमध्ये दोन तरुणी घाबरलेल्या व भेदरलेल्या अवस्थेत फिरत असल्याबाबत पोलीस पाटील योगेश सुरेश घोलप यांनी तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व सरपंच यांनी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांचेशी संपर्क केला.

पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कावळे यांनी लागलीच समय सूचकता दाखवत सदरच्या दोन्ही मुलींना गावांमधील तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील यांचे घरामधील स्त्रियांच्या मदतीने रात्री बारा वाजण्याचे सुमारास दिंडोरी पोलीस ठाणे येथे आणण्यात आले.

दोन्हीही मुलींना विचारपूस करता एक 23 वर्षीय मुलगी राहणार शास्त्रीनगर, वाडा, जिल्हा पालघर व एक सतरा वर्षीय मुलगी रा. साईनगर शहापूर हल्ली वाडा जिल्हा पालघर येथील असल्याचे निष्पन्न झाले यातील 17 वर्षीय युवतीचे एका मुलासोबत लग्न होणार होते.

परंतु ते झाले नाही म्हणून घरामधून निघून आली होती व ती आत्महत्या करण्याचे विचारात होती. परंतु तिची 23 वर्षीय मैत्रीण हिने तिला समजावून सांगत आत्महत्या करने पासून परावृत्त करीत नाशिक येथे नातेवाईक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्याकडे जाऊ असे समजावून सांगत त्या दोघी नाशिकला आल्या व पुढे पिंपळनारे येथे आल्या येथे त्या मध्यरात्री भेदरलेल्या अवस्थेत फिरत होत्या ग्रामस्थांनी वेळीच पोलिसांना माहिती दिली.

महिला पोलीस अंमलदार नाईक, गारुंगे यांनी त्यांची चौकशी केली त्यांना सुरक्षित ठेवले तसेच वाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कदम यांच्याशी संपर्क करून दोन्ही मुलींचे फोटो पाठविले.

त्याबाबत त्यांनी खात्री केली असता, वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 378/23 भादवि कलम 363 प्रमाणे दाखल आहे.

सदर गुन्ह्याच्या तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी बाणे यांचे पथक पहाटेच दिंडोरी येथे दाखल झाले.

त्यानुसार दोन्ही मुलींना दिंडोरी पोलिसांनी वाडा पोलिसांकडे सुरक्षित रित्या सुपूर्द केले. सतर्क दिंडोरी पोलीस व पिंपळनारे ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT