Leopard attack esakal
नाशिक

Nashik News : आखतवाडेत बंदिस्त गोठ्यात शिरकाव करून बिबट्याकडून 2 शेळ्या ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Leopard Attack : बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील शेतीशिवारात बिबट्याचा हैदोस वाढल्याने शेतकऱ्यांत भीतीचे सावट पसरले आहे. शेतातील बंदिस्त गोठ्यात बिबट्याने प्रवेश करीत दोन गाबन शेळ्या ठार केल्याची घटना शनिवार (ता.८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

स्थानिक शेतकऱ्यांनी सटाणा वनपरिक्षेत्रात माहिती दिल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. (2 goats killed by leopard after entering closed cowshed in Akhatwada Nashik News)

करंजाडी खोऱ्यातील आखतवाडे, बिजोटे, भुयाणे परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने शेतीशिवारातील शेतकरी भयभीत झाले आहेत. या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबटे तळ ठोकून असल्याने पाळीव जनावरांवर रात्रीतून हल्ले वाढत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे

बिजोटे शिवारातील शेतकरी दादाजी त्र्यंबक ह्याळीज यांचे गट क्र. २३२/१ मध्ये पत्र्याचे घर तसेच घराला लागून बंदिस्त गोठा तयार केला आहे. श्री. ह्याळीज यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन केले असून पहाटेच्या सुमारास बंदिस्त गोठ्यात बिबट्याने लोखंडी संरक्षक जाळी उचकटून प्रवेश करीत गाभन शेळ्या ठार केल्याचे उघडकीस आले एक शेळी गोठ्यात तर दुस-या शेळीला फरफटत डाळींब बागेत नेल्याचे दिसून आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

स्थानिक शेतकऱ्यांनी सटाणा वनपरिक्षेत्रात याबाबत माहिती दिली असता वनकर्मचारी दाखल होत पंचनामा केला. शेतीशिवारात रात्रीपहाटे कांदा, गहु काढणीचे काम सुरू असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

या परिसरात एकापेक्षा अधिक बिबटे असल्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी भिका ह्याळीज, ग्यानदेव ह्याळीज, दादाजी ह्याळीज, संजय खैरनार, आनंदा ह्याळीज, देवीदास ह्याळीज, पंडित ह्याळीज, सुरेश ह्याळीज, संतोष ह्याळीज, शिवाजी जाधव, हरि ह्याळीज, आनंदा महारू ह्याळीज, सुपडू ह्याळीज, भरत खैरनार, कैलास ह्याळीज यांच्यासह बिजोटे, आखतवाडेसह परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT