Aniket Dighe & Somnath Hilam esakal
नाशिक

Accidental Death News : सिन्नर-निफाड रस्त्यावर दुचाकी अपघातात 2 ठार

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-निफाड रस्त्यावर बुधवारी (ता. ५) दुपारी दीडच्या सुमारास बारागाव पिंप्रीदरम्यान सुळेवाडी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले. यातील एक जण सिन्नर शहरातील, तर दुसरा नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील होता. ऐन दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. (2 killed in two wheeler accident in Sinnar Niphad road Nashik Latest Marathi News)

अनिकेत बबन दिघे (वय २४, रा. कानडी मळा, सिन्नर) व सोमनाथ मधुकर हिलम (२५, रा. पांढरवड वस्ती, मूळ डोंगरी (साकोरे) ता. नांदगाव) अशी मृतांची नावे आहेत. अनिकेत त्याच्या शाईन मोटारसायकलने (एमएच १७- बीजी ७६२३) बारागावपिंप्रीहून सिन्नरला येत होता. तो आईला विंचूरला सोडवून पुन्हा येत होता. तर सोमनाथ आपल्या मोटारसायकलने (एमएच ४१- बीजे १९८६) घोटी येथील नांदगावकडे जात होता.

सिन्नर ते बारागावपिंप्रीदरम्यान सुळेवाडी फाट्याजवळ हे दोघेही एकमेकांवर धडकले. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही दुचाकी ओळखण्यापलीकडे झाल्या होत्या. दोघेही गंभीर अवस्थेत जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे जागेवरच पडून होते. अतिरक्तस्रावामुळे दोघांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

अखेर काही वेळेनंतर सिन्नरहून अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून दोघांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिन्नर पालिका रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांना देण्यात आले. एमआयडीसी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT