arrested criminal & seized stuff esakal
नाशिक

Nashik Crime : 2 गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसे जप्त; 6 संशयितांना अटक

वाल्मीक शिरसाट : सकाळ वृत्तसेवा

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पोलिसांनी दोन गावठी कट्टे (pistols) व तीन जिवंत काडतुसे (cartridges) जप्त करत सहा संशयितांना अटक केली आहे. सम्राट हॉटेल, विजयनगर, भगूर येथे पाच ते सहा जण अवैध अग्निशस्त्र घेऊन अज्ञात कारणासाठी जमलेले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांना मिळाली. (2 pistols 3 live cartridges seized 6 suspects arrested by deolali camp police Nashik Crime News)

त्यांनी गस्ती अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन शहानिशा करण्याचे व कारवाईचे आदेश दिले. गस्त अधिकारी लियाकत पठाण व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, भगूर पोलिस चौकीचे अंमलदार व बिट मार्शल्स, पेट्रोलिंग मोबाईल अंमलदार यांनी सम्राट हॉटेल येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे २ गावठी कट्टे व ३ जिवंत काडतूस तसेच ५३ हजार रुपये रोख रक्कम, असा मुद्देमाल मिळून आला. त्यांना ताब्यात घेऊन वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव यांनी सर्व वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, उपनगराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनला भेट देवून मार्गदर्शन केले.

प्रशांत नानासाहेब जाधव (२५, रा. देवळाली गाव), आतिश कैलास निकम (२५, रा. रोकडोबा वाडी, देवळाली गाव), सागर किसन कोकणे (२४, रा. चेहडी पंपिंग स्टेशन), रोहन संजय माने (२१, रा. गायकवाड मळा, नाशिक रोड), रेहमान जाफर शेख (२२, रा. राजवाडा, देवळाली गाव), गौरव बाळासाहेब पडोळ (२२, रा. सुभाष रोड) यांनी अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, प्रकाश गिते, वैशाली मुकणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. पुढील तपास उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT