Police taking bribe esakal
नाशिक

नाशिक : मटक्यासाठी लाच घेणारे 2 पोलिस कर्मचारी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

वडनेर भैरव (जि. नाशिक) : येथून जवळच असलेल्या शिरवाडे फाट्याजवळ वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय (Matka) सुरू करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच (Bribe) घेताना दोन हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने पकडले. लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (2 police arrested for taking bribe for matka Nashik Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त असे, की वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिरवाडे फाट्याजवळ तक्रारदाराला मटका सुरू करायचा होता. त्यासाठी वडनेर भैरवच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास ८० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी ४० हजार रुपये गुरुवारी (ता. ९) देण्यासाठी फिर्यादीसह लाचलुचपत विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता, वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘उद्या सकाळी या’, असे सांगून विषय लांबविला. त्यानुसार फिर्यादीने शुक्रवारी (ता. १०) मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटीजन या ठिकाणी मध्यस्थी पोलिस शिपाई किसन रमेश कापसे (वय ३२) याच्या माध्यमातून दुसरा पोलिस कर्मचारी संतोष दिनकर वाघ (वय ३९) यांच्याकडे ठरलेली रक्कम दिली.

त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम वडनेर भैरव पोलिस ठाण्यात सुरू होते. पथकामध्ये पोलिस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलिस नाईक प्रकाश महाजन यांचा समावेश होता.

सहाय्यक निरीक्षक संशयाच्या भोवऱ्यात

एकीकडे पोलिस अधीक्षक जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे द्राक्षपंढरी संबोधल्या जाणाऱ्या आणि माजी आमदाराच्या गावातील पोलिस ठाण्यातील अधिकारीच अवैध धंद्यांना पाठीशी घालण्यासाठी लाच प्रकरणात अडकत असतील, तर यासारखी लाजीरवाणी बाब नाही, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana Crop Loss,: पाण्याअभावी उभ्या केळीच्या बागेवर फिरविला ट्रॅक्टर; अडीच एकरांतील तीन हजार झाडे उद्ध्वस्त; साडेतीन ते चार लाखांचा खर्च मातीमोल

R. Ashwin: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियातील करिअर संपलं? अश्विनने सांगितलं मोठं कारण; मोहम्मद शमीच्या कमबॅकचे संकेत!

Latest Marathi News Live Update : लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या एचआयएएलला बजावली नोटीस

Diwali Pet Care: फटाक्यांच्या आवाजाने कुत्रे-मांजर घाबरतात? अशी घ्या काळजी; पशुवैद्यांनी सांगितल्या ५ टिप्स

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

SCROLL FOR NEXT