nashik crime news esakal
नाशिक

Crime Update : हत्यारे बाळगून असलेल्या 2 संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने हत्यारांसह दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन धारदार हत्यारांसह रिक्षा जप्त करण्यात आली. (2 suspects arrested for carrying weapons Latest nashik Crime Update Marathi News)

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी यांना दोन संशयित गंगापूर रोड येथील मॅरेथॉन चौकात हत्यार बाळगून रिक्षात बसले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

वरिष्ठ निरीक्षक आँचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. माळी, पोलिस कर्मचारी शेरखान पठाण, श्री. सपकाळ, बाळू बागूल, संजय गामणे, संदीप पवार घटनास्थळी दाखल झाले. रिक्षा (एमएच- १५- ईएच- २६३८) उभी असल्याचे आढळून आले.

त्यांनी संशयित हर्षद सुभाष बरु (२८, रा. शिवाजीनगर, सातपूर), अभिषेक मारुती कांबळे (१९, रा. रामनगर जेहान सर्कल) अशा दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार चॉपर आणि कोयता मिळून आला. दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई सरकारवाडा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT