Swine Flu latest Marathi news esakal
नाशिक

Nashik : स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळले

विक्रांत मते

नाशिक : शहरात पावसापाठोपाठ आता साथीच्या आजारांच्या (Epidemic diseases) उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील पाच दिवसात डेंगी चार, स्वाईन फ्लू दोन, चिकूनगुनियाचा एक रुग्ण आढळून आल्याने पूरस्थितीनंतर आता वैद्यकीय विभागाची जबाबदारी वाढली आहे. (2 swine flu patients found in city Nashik Latest Marathi News)

शहरात कोरोना परिस्थिती गंभीर असल्याने इतर आजारांकडे नागरिकांचे लक्ष जात नव्हते. मात्र, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर डेंगी, चिकूनगुनिया, स्वाईन फ्लू या पारंपरिक आजारांनी डोके वर काढण्यास सुरवात केली आहे.

जुलै महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दोन, डेंगीच्या रुग्णांची संख्या चार, तर चिकूनगुनियाचा एक रुग्ण सापडला आहे. पावसामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

डेंगी, स्वाईन फ्लू व चिकूनगुनियाच्या लक्षणांमध्ये साम्य आढळून येत आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी ही सारखीच लक्षणे असल्याने नागरिकांनी अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT