Arrest esakal
नाशिक

Nashik Crime News : 2 तडीपार गुंडांना अटक!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तडीपार केले असतानाही शहरात वावरणाऱ्या दोघा गुंडांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. याबाबत तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दीपक ऊर्फ डेमो भाऊसाहेब जाधव (२२, रा. हनुमंतनगर, लोखंडे मळा, जेलरोड) व अजय प्रवीण दहेकर(२१, रा. शांती विलास अपार्टमेंट, आनंदनगर, पाथर्डी शिवार) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. (2 Tadipar gangsters arrested Nashik Crime News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या व विनापरवानगी शहरात आलेल्या तडीपारांवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते.

त्याअनुषंगाने मोहीम सुरू असताना शनिवारी (ता. ७) युनिट दोनचे हवालदार सुगन साबरे यांना दीपक ऊर्फ डेमो याची माहिती मिळाली. त्यांनी कारवाई करून ताब्यात घेतले. त्याचा ताबा उपनगर पोलिसांकडे दिला आहे. यासह हवालदार चंद्रकांत गवळी यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय हा हॉटेल गारवा फॅमिली गार्डनजवळ आल्याची माहिती समजली.

त्यांनी पथकासह त्याला पकडून इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. युनिट दोनचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार प्रकाश भालेराव, सुगन साबरे, राजेंद्र घुमरे, शंकर काळे, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रशांत वालझाडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT