Teachers Recruitment sakal
नाशिक

Teacher Recruitment Exam : शिक्षक भरतीच्या 2 परीक्षा एकाच कालावधीत; तयारी करणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : शिक्षकभरतीसाठी तब्बल पाच वर्षांनी होणारी राज्यस्तरावरील अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आणि देशपातळीवर होणारी केंद्रीय शिक्षक संघटन ही प्राथमिक शिक्षकपदासाठी होणारी परीक्षा एकाच आठवड्यात आली आहे.

यामुळे शिक्षकभरतीसाठी वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुण उमेदवारांपुढे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. (2 teacher recruitment exams in same period Hermod of candidates preparing Nashik News)

पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षकभरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडून ऑनलाइन परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत होणार आहे. त्या वेळी केंद्रीय विद्यालयासाठी होत असलेली परीक्षा २१ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे.

एकाच वेळी येणाऱ्या दोन परीक्षांमुळे मात्र विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. याशिवाय इतर अनेक परीक्षाही याच कालावधीत होत असल्याने या उमेदवारांना इतर परीक्षांना मुकावे लागणार आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

ऑनलाइन परीक्षांच्या तयारीसाठीही अल्प वेळ मिळत असल्याची नाराजी ते सोशल मीडियावर व्यक्त करीत आहेत. आता नेमके काय करावे, असा एकच प्रश्न डीएलएड, बीएड पात्रताधारकांना असून, दोन्हीकडे तयारी करणाऱ्या पडला आहे.

"राज्यभरातून हजारो उमेदवार अभियोग्यता चाचणीच्या परीक्षेसाठी तयारीला लागले आहेत. परीक्षेच्या सरावासाठी मिळणारा कालावधी कमी आहे. शिवाय इतर परीक्षांच्या तयारीसाठी वेळही अपुरा आहे. एकाच वेळी आलेल्या अनेक परीक्षांमुळे होतकरू उमेदवारांची संधी हुकू नये, यासाठी केंद्र करणार नसेल तर राज्याने तरी वेळापत्रकात बदल करणे योग्य ठरेल."

-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बी.एड. स्टुडंट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT