2 thaousand patients have died due to corona in Nashik district marathi news 
नाशिक

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २ हजार बळी; मृतांमध्ये सर्वाधिक रुग्ण ६१ वर्ष वयापुढील

अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आत्तापर्यंत २ हजार ००४ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यात सर्वाधिक १ हजार १०५ बाधितांचे वय ६१ वर्षापुढील आहे. दरम्‍यान आत्तापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंपैकी तब्‍बल १ हजार २२४ रुग्णांना यापूर्वी कुठल्‍याही स्‍वरूपाचा गंभीर आजार नसताना, कोरोनामुळे जीव गमवावा लागला. जिल्ह्याचा मृत्‍यूदर १.७९ इतका आहे. 

आत्तापर्यंत जिल्ह्यात झालेल्‍या २ हजार ४ मृत्‍यूंमध्ये सर्वाधिक १ हजार ४३३ पुरुष तर ५७१ महिला रुग्णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. मालेगाव परिसरातील वृद्ध रुग्णाच्या मृत्‍यूने जिल्ह्या‍तील पहिला बळी गेला होता. त्‍यानंतर पुढील काही दिवस मालेगाव येथील मृत रुग्णांची संख्या चिंताजनक होती. मात्र कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाताना नाशिक शहरातून, नाशिक ग्रामीण भागातून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण वाढत गेले. 

उपचारादरम्‍यान मृत्‍यूचे प्रमाण अधिक 

कोरोनाची लागण झाल्‍याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी १३ रुग्णांचा मृत्‍यू झालेला होता. उपचार सुरू असताना पहिल्‍या दिवशी ३७९, दुसऱ्या दिवशी २३१, उपचाराच्‍या तिसऱ्या दिवशी १८१, चार किंवा त्‍यापेक्षा अधिक दिवसांचा उपचार घेतल्‍यानंतरही १ हजार २०० बाधितांचा जीव वाचविता आला नाही. 

गंभीर स्‍वरूपाचे आजार नसताना मृत्‍यू 

आत्तापर्यंत झालेल्‍या मृतांमध्ये १ हजार २२४ रुग्णांना कुठल्‍याही स्‍वरूपाचा गंभीर आजार नव्‍हता. तर २५१ रुग्णांना हायपर टेंन्‍शन, २९४ रुग्णांना मधुमेह, १०१ रुग्णांना श्‍वसनाशी निगडीत आजार तर १३४ बाधिताना अन्‍य गंभीर स्‍वरूपाचे आजाराची पार्श्वभूमी होती. 


वयोगटनिहाय मृतांचा तपशील असा- 
० ते १२ वर्षे---------०२ 
१३ ते २५ वर्षे-------१९ 
२६ ते ४० वर्षे------१३७ 
४१ ते ६० वर्षे------७४१ 
६१ वर्षापुढील------११०५ 

दिवसभरात २३३ पॉझिटिव्ह, ३१७ रुग्ण बरे, सात मृत्‍यू 

गुरूवारी (ता.७) दिवसभरात २३३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापैकी १७१ नाशिक शहरातील असून, नाशिक ग्रामीणमधील ५४, मालेगाव महापालिका हद्दीतील पाच, जिल्‍हाबाहेरील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात ३१७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून सात जणांचा मृत्‍यू झाला. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील तीन, नाशिक ग्रामीणमधील चार बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७०३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २८८ संशयित रुग्णालय, गृहविलगीकरणात दाखल झाले. १ हजार ८९० अहवाल प्रलंबित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT