2 wheeler theft increase in city nashik crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News: शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरात दररोज दुचाक्या चोरीला जात आहेत. बुधवारी (ता.१३) पुन्हा आयुक्तालय हद्दीतून चार दुचाक्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे. (2 wheeler theft increase in city nashik crime news )

योगेश वसंत देसले (रा. समर्थ ॲनेक्स अपार्टमेंट, रासबिहारी लिंकरोड) यांची १५ हजारांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५ डीए १९०६) गेल्या सोमवारी (ता.११) मध्यरात्री त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज कौतिक गवारे (रा. अंबिका पॅराडाईज, एकदंतनगर, अंबड) यांची ९० हजारांची बुलेट दुचाकी (एमएच १५ डीएफ ९५९५) गेल्या बुधवारी (ता.१३) दुपारी दीडच्या सुमारास राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर छबू जगताप (रा. साईबंधन अपार्टमेंट, इंदिरानगर) यांची ५० हजारांची शाईन दुचाकी (एमएच १५ एचजे ८७२४) गेल्या शनिवारी (ता.९) मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, स्नेहा राजेंद्र त्रिपाटी (रा. आर्टिलरी सेंटर) यांची २५ हजारांची ॲक्टिवा मोपेड (एमएच १५ जीसी २१३५) गेल्या मंगळवारी (ता.१२) रात्री पावणे आठच्या सुमारास राजराजेश्वर मंगल कार्यालयाच्या गेटजवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Traffic Jam : कोकणात जाणाऱ्यांची लगबग; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लाब रांगा...

आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकणार! पोस्ट ऑफिस Mutual Funds चे नवे हब बनणार; ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

जन्माष्टमीला बाळाला कृष्ण केलं, तीन दिवसांनी नदीत उडी; चौथ्या दिवशी पतीने बाळासह तिथंच घेतली जलसमाधी....

Ganesh Chaturthi 2025: भारतभर गाजणारा बाप्पांचा जल्लोष! जाणून घ्या विविध राज्यांतील खास गणेशोत्सवाच्या परंपरा

Latest Marathi News Updates : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला

SCROLL FOR NEXT