tank of ankai fort esakal
नाशिक

अनकाई किल्ल्यावरील कुंडात कोपरगावच्या 2 युवकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : अनकाई किल्ल्यावरील पाण्याच्या खोल कुंडात बुडून आज दोन युवकांचा मृत्यू झाला. हे दोघेही कोपरगाव तालुक्यातील आहेत. (2 youths of Kopargaon died in tank on Ankai Fort nashik Latest Marathi News)

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या अनकाई किल्ल्यावर श्रावणातील चारही सोमवारी मोठी यात्रा भरते. यासाठी आजूबाजूच्या चारही जिल्ह्यातून अनेक पर्यटक किल्ला चढाई करण्यासाठी येत असतात. काल (ता. १५) तिसऱ्या सोमवार निमित्तही येथे मोठी गर्दी होती. आज (ता.१६) ही अनेक पर्यटक किल्ल्यावर आलेले होते.

मंगळवारी कोपरगाव येथील सुमारे १७ युवक किल्ल्यावर दर्शन व पर्यटनासाठी आले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मिलिंद देविदास जाधव (वय २७, रा. गोरोबानगर, कोपरगाव, जि. नगर) हा कुंडात पोहोण्यासाठी उतरला.

कुंडातील खोलीचा अंदाज न आल्याने मिलिंद हा पाण्यात बुडायला लागल्याने रोहित परशराम राठोड (वय १८,रा. बस स्थानकाच्या पाठीमागे, सुभाषनगर, कोपरगाव, जि. नगर) याने मिलिंदला वाचविण्यासाठी कुंडात उडी घेतली. पण हा कुंड धोकादायक असून खोलवर असल्याने त्यालाही अंदाज आला नाही. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

घटनेची माहिती अनकाई गावातील पोलिस पाटील संतोष परदेशी यांना समजताच येथील ग्रामरक्षक दलाच्या २५ युवकांनी किल्यावर धाव घेतली. रविराज अहिरे, राहुल सोनवणे यांनी पाण्यात जाऊन शोध घेतला मात्र शोध न लागल्याने त्यांच्यासह राजू परदेशी, अक्षय वैद्य, राहुल सोनवणे, लखन व्यापारे, शरद देवकर, अतुल अहिरे, सचिन जाधव, ज्ञानेश्वर देवकर, दीपक देवकर, सुखदेव सोनवणे, राहुल सोनवणे, विकास देवकर, शुभम शेलार, अन्वर पठाण, रमजान पठाण, गुड्डू पठाण, श्रीराम सोनवणे आदींनी कुंडातून दोर व गळाच्या साह्याने दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोलिस नाईक आबा पिसाळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली.

दरम्यान, या कुंडात यापूर्वीही अनेकदा युवक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी देखील कोपरगाव तालुक्यातील युवकाच्या बाबतीतच घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT