goat esakal
नाशिक

नाशिक : गटारी अमावस्येच्या दिवशी 20 बकऱ्यांची चोरी

एकाचवेळी वीस बकऱ्या पूर्णपणे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : पिंगळवाडी, ता. दिंडोरी येथील शेतकऱ्याच्या गटारी अमावस्येच्या (ता. २८) दिवशी वीस बकऱ्यांची अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेल्याची खळबळजनक घटना घडली असून याबाबत वणी पोलिसांत बकऱ्या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

पिंगळवाडी, ता. दिंडोरी येथील त्रंबक रेवजी भरसट यांचा शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून बकरी पालनाचा व्यवसाय आहे. त्यांची पिंगळवाडी शिवारातच शेतजमिन गट नं. ७ असून सदर क्षेत्रात त्यांचे घर व त्याला लागुन बकऱ्या पालनासाठी शेड बनवीला आहे. गुरुवार, ता. २८ रोजी मुलगा नामे घेवर त्रंबक भरसट हा नजीकच्या डोंगरावर नेहमी प्रमाणे आपल्याकडे असलेल्या सर्वच्या सर्व वीस बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेला होता. बकऱ्या चारुन झाल्यानंतर नित्य नियमाने डोंगरावरच बकऱ्यांना नेहमीच्या जागी बसवुन दुपारी जेवणासाठी १२ वाजेच्या दरम्यान डोंगर उतरुन खाली आला. व जेवण आटोपून तो पुन्हा दोन वाजेच्या दरम्यान परत डोंगरावर गेला असता त्यास संबधीत जागी बकऱ्या दिसुन आल्या नाही.

दरम्यान भरसट कुटुंबीयांनी संपूर्ण डोंगर परीसर, पिंगळवाडी शिवार, आसपासची गावे, बाजाराची ठिकाणे यांचा बकऱ्यांचा शोध घेतला असता मिळुन आल्या नाही. चोरी गेलेल्या कमध्ये काळ्या रंगाच्या ५ बकऱ्या, ताबंड्या ८, पांढऱ्या ५, काळी - पांढरी रंगाच्या ३ अशा वर्णनाच्या एकूण १ लाख किमंतीच्या २० बकऱ्यांचा समावेश आहे. पिंगळवाडी शिवारात अधून मधून बिबट्याचा वावर होत असला तरी एकाचवेळी वीस बकऱ्या पूर्णपणे गायब झाल्याने अज्ञाच चोरट्याने बकऱ्यांचा माघावर राहून बकऱ्या हुसकावून नेउन व वाहनात घालून चोरून नेल्या असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत त्रंबक भरसट यांनी वणी पोलिसांत बकऱ्या चोरीची तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT